- सचिन जाधव
आगामी लाेकसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दाेन जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale latest marathi news) यांनी माध्यमांशी बाेलताना व्यक्त केले. दरम्यान शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा देखील आठवलेंनी यावेळी व्यक्त केली. (Maharashtra News)
भोर येथे आयाेजिलेल्या एका कार्यक्रमासाठी मंत्री रामदार आठवले आले हाेते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. आठवले म्हणाले आगामी लोकसभेत महायुती राज्यात 40 पेक्षा जास्त जागांवर तसेच देशात 400 पेक्षा अधिक जागांवर विजयी हाेईल. कुणाला निवडून द्यायचं ही जनतेची जबाबदारी असते, आणि गेल्या साडेनऊ वर्षात आम्ही केलेल्या कामावरून जनतेसमोर जाण्याचा आम्हाला अधिकार आहे असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान आरपीआयला जागा वाटपामध्ये 2 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे असेही आठवलेंनी नमूद केले. ते म्हणाले मी 2026 पर्यंत राज्यसभेमध्ये आहे, यापूर्वी काँग्रेस अलायन्समध्ये असताना 1 वेळेला मुबंई आणि 2 वेळेला पंढरपूरमध्ये असं तीन वेळा मी लोकसभेला निवडून आलो होतो.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शिर्डीमध्ये मी एकदा हरलो होतो. त्यामुळं पुन्हा शिर्डीमधून लढण्याची माझी इच्छा आहे. संधी मिळाली तर मी त्या ठिकाणाहून लढेल असे सांगत रामदास आठवले यांनी शिर्डी मधून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.