राज्य सरकारने तातडीने मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा २० जानेवारीला मुंबईत येऊन मोठं आंदोलन करू, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून जरांगेंनी मुंबईत येऊन आंदोलन करू, नये अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. यावर आज म्हणजेच सोमवारी दुपारी २ वाजता सुनावणी होणार आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनावर आता मुंबई हायकोर्ट काय निर्णय घेतं? याकडे संपूर्ण मराठा समाजाचं (Maratha Reservation) लक्ष लागून आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलन सुरू केलं होतं.
राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेत सरकारला आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी २४ डिसेंबरपर्यंत डेडलाईन दिली होती. मात्र, फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलं. (Latest Marathi News)
मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर मनोज जरांगे यांनी लाखो मराठा बांधवांना घेऊन मुंबईत धडकण्याचा इशारा दिला. २० जानेवारीपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्या, अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करू, असा इशाराच मनोज जरांगे यांनी सरकारला दिला.
२० जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मराठा आंदोलक निघतील. बीडच्या शहागड, गेवराई, पाडळशिंगी, मादळमोही, तांदळा, मातोरी, खरवंडी मार्ग अहमदनगर जिल्ह्यात दाखल होती.
यानंतर पाथर्डी, तीसगाव, करंजी घाट, अहमदनगर, केडगाव मार्ग मराठा आंदोलक पुण्याला पोहचतील. सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजगणाव, वाघोली, खराडी बायपास, चंदननगर, शिवाजीनगर, पुणे-मुंबई एक्स्प्रेसमार्गे लोणावळा मार्ग नवी मुंबईत दाखल होतील. त्यानंतर वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदानावर पोहचतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.