Pune By Elections: पुणे लोकसभा पोटनिवडणूक: उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

Pune Loksabha By Election: 'पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या..' असे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
Pune Loksabha By Election
Pune Loksabha By ElectionSaam TV

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. ८ जानेवारी २०२४

Pune Loksabha By Election:

भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गेल्या ९ महिन्यांपासून पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. महिनाभरापुर्वी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घ्या.. असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या प्रकरणी आता महत्वाची अपडेट समोर आली असून उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

गेल्या ९ महिन्यांपासून रिक्त असलेली पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या.. असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते. या निकालाविरोधात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

सार्वत्रिक निवडणुकीला थोडाच वेळ बाकी आहे, त्यामुळे पोटनिवडणुक नको असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हणले आहे. तसेच पोटनिवडणूकांबाबत कायद्याची स्पष्टता करू, असेही न्यायालयाने म्हणले आहे. या प्रकरणी याचिकाकर्त्यांना चार आठवड्यांची मुदत देण्यात आली असून पुढील सुनावणी सात आठवड्यांनी होणार आहे.

  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Loksabha By Election
Talathi Bharati 2023: 'तलाठी भरती घोटाळ्याचा मास्टरमाईंड शोधा, अन्यथा...' ठाकरे गट आक्रमक; सरकारला इशारा

दरम्यान, अन्य राज्यातील निवडणुका घेण्यात आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत पुणे येथील लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेणे कठीण झाले होते, असा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाने केला होता. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणूकांना थोडाच अवधी राहिल्याने ही पोटनिवडणूक न घेण्याचे आदेश दिले आहेत. (latest Marathi News)

Pune Loksabha By Election
Sharad Mohol News : शरद मोहोळवर फायरिंगवेळी आरोपींची घोषणाबाजी, पोलीसही संभ्रमात, तपासाची दिशा बदलणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com