Talathi Bharati 2023: 'तलाठी भरती घोटाळ्याचा मास्टरमाईंड शोधा, अन्यथा...' ठाकरे गट आक्रमक; सरकारला इशारा

Talathi Bharati: तलाठी भरती परीक्षेच्या निकालावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाचे कारण म्हणजे परिक्षेत प्रथम क्रमांक पटकवलेल्या मुलीला चक्क २०० पैकी २१४ गुण मिळाले आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam TV
Published On

गिरीश कांबळे, प्रतिनिधी|ता. ८ जानेवारी २०२४

Maharashtra Talathi Result 2023:

नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाचे कारण म्हणजे परिक्षेत प्रथम क्रमांक पटकवलेल्या मुलीला चक्क २०० पैकी २१४ गुण मिळाले आहेत. यावरुनच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले आहे. तसेच ही परिक्षा रद्द करुन नव्याने पारदर्शक परीक्षा घेण्याची मोठी मागणी ठाकरे गटाने केली आहे.

तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ही तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने तीन महिन्यात पारदर्शक भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी राज्य सरकारकडे केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांसोबत शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरणार असल्याचाही इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

तलाठी भरती प्रक्रिया ही पहिल्या दिवसापासूनच संशयाच्या भोवऱ्यात होती. या तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणात गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत आणि आता निकाल जाहीर झाल्यानंतर गुणांमध्ये विसंगती आहे. सरकार ही परीक्षा आणि ही सगळी प्रक्रिया पारदर्शक झाली असल्याचा दावा करत असेल तर मग गुन्हे कसे दाखल झाले ? याचे उत्तर सरकारने द्यावे.. असे कैलास पाटील म्हणालेत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray
Saam Impact: 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर गाेंदियात 40 पेक्षा अधिक डाॅक्टरांकडून रक्तदान, नागरिकांनी पुढाकार घ्यावा

सरकार या सगळ्या प्रकरणात पुरावे विद्यार्थ्यांकडून मागत आहेत हे चुकीचे असून सरकारने ही जबाबदारी घेऊन या सगळ्या मागचा मास्टरमाईंड समोर आणावा, ही आमची मागणी आहे. ही सगळी भरती प्रक्रिया आता रद्द करून राब्याने तलाठी भरती परीक्षा घेऊन तीन महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी अशी आमची आता सरकारकडे विद्यार्थ्यांच्या वतीने मागणी राहील. असेही पाटील म्हणालेत. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray
Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणात गुजरात सरकारला झटका; दोषींच्या सुटकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com