Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांचं भाजपनं रणशिंग फुंकलं? १३ जानेवारीला या राज्यातून PM मोदी फोडणार प्रचाराचा नारळ?

Lok Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाने (भाजप) लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं असून १३ जानेवाराली पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्यापूर्वी मोदी गुजरात, महाराष्ट्र आणि बिहारचा दौरा करणार आहेत.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Saam Digital
Published On

Lok Sabha Election 2024

भारतीय जनता पक्षाने (भाजप) लोकसभा निवडणुकीचं रणशींग फुंकलं असून १३ जानेवाराली पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्यापूर्वी मोदी गुजरात, महाराष्ट्र आणि बिहारचा दौरा करणार आहेत. बिहारमध्ये बेगुसराय, बेतिया आणि औरंगाबादमध्ये त्याच्या ३ सभा आणि रोड शोंचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर लगेचच गृहमंत्री अमित शाह आणि अध्यक्ष जे. पी. नड्डाही याच महिन्यात बिरामध्ये प्रचाराला जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ फेब्रुवारीपूर्वी या तीन राज्यांचा दौरा करणार आहेत. दोन दिवस गुजरात तर एक दिवस महाराष्ट्राचा दौरा असेल. व्हायब्रंट गुजरात परिषदेसाठी ८ जानेवारी रोजी मोदी गुजरातमध्ये असतील. शिखर परिषदेत सहभागी होण्यासोबतच मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटीलयांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करणार आहेत. भाजपने या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.  

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lok Sabha Election 2024
Winter News Railway Track Shrinking: राजस्थानमध्ये थंडीचा कहर; चुरूमध्ये रेल्वेरुळही आकुंचन पावले, २ इंचाचा आला गॅप

शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अनेक राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. मंगळवारी सकाळी ९ वाजता गांधीनगरमध्ये ब्रीफिंग होणार आहे. त्यानंतर ३ वाजता व्हायब्रंट गुजरात ग्लोबल ट्रेड शो चे उद्घाटन होईल. सायंकाळी ५.३० वाजता विमातळावर युएई अध्यक्षांचे स्वागत, ६ वाजता साबरमती आश्रमाला भेट देतील. ७ वाजता UAE अध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा आणि स्नेहभाजनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Lok Sabha Election 2024
WB TMC Leader : तृणमूल काँग्रेस नेते सत्येन चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com