(भूषण अहिरे)
यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने राज्यातील अनेक भागात दुष्काळाचे संकट ओढवले आहे. अनेक जिल्ह्यात भूजल पातळीत घट झालीय. पाणीसाठ्यात घट झालीय. धुळे शहरातील नाकाने तालावातील पाणी पातळी खालावली असून यावरून माजी आमदार अनिल गोटे यांनी पालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपवर चांगलाच निशाणा साधला. (Latest News)
धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून हा निशाणा साधला. तब्बल २५४ वर्षानंतर नकाने तलावाची पाणी पातळी खालावली आहे. सत्ताधाऱ्यांनी धुळेकरांना अक्कलपाडा धरणाचे पाणी पुरवण्याच्या आशेवर धुळेकरांना तब्बल ५ वर्ष झुलवत ठेवले असल्याचा देखील आरोप त्यांनी या पत्रकातून केला.(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान ते १६ जानेवारी रोजी नकाणे तलावाच्या एक्सप्रेस कॅनोलला भेट देण्यासाठी जाणार असल्याचं गोटे यांनी सांगितले. माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी पाटबंधार विभागाला कळविले असून, तत्पूर्वी नकाणे तलावात पाणी वाहून नेणारा एक्सप्रेस कॅनोल हा दुरुस्त झालाच पाहिजे,असे देखील गोटे यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे.
नाशकात भीषण पाणीटंचाईचे सावट
दरम्यान यंदा नाशिकमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने पाणी टंचाई आणि दुष्काळाची समस्या निर्माण झालीय. नाशिकमध्ये पावसाने सरासरीही न गाठल्याने जिल्ह्यातील १५ पैकी ११ तालुक्यात भूजळ पातळीत घट झालीय. आतापर्यंत ही भूजल पातळी २.१३ मीटरपर्यंत घटलीय. नाशिकमध्ये दिडोंरी तालुक्यात किमान ०.५ तर चांदवड तालुक्यात २.१३ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट झाली आहे. भूजल पातळी घटल्याने जिल्ह्यात दुष्काळाचा निर्देशांक वाढला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.