भूजल पातळी वाढविण्यासाठी सर्वस्तरातून हवे प्रयत्न; नंदुरबारात जलदिंडी

भूजल पातळी वाढविण्यासाठी सर्वस्तरातून हवे प्रयत्न; नंदुरबारात जलदिंडी
Nandurbar
NandurbarSaam tv
Published On

नंदुरबार : नैसर्गिक बदलामुळे पावसाचे प्रमाण व वेळ अनिश्चित झाल्याने पाण्याचे नियोजन करणे अडचणीचे झाले आहे. अशा परिस्थितीत भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी केले आहे. (nandurbar news Jaldindi week in Nandurbar all river water kalash)

Nandurbar
Dhule: जलयुक्‍त शिवारात भ्रष्‍ट्राचार विरोधात अर्धनग्‍न आंदोलन

16 ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह (Nandurbar News) राबविण्यात येत असून विविध विभागानी गावागावात जाऊन ग्रामपंचायत, शाळा, गावचावडी येथे जावून गावातील ग्रामस्थ, नागरिकांना सिंचन प्रकल्पाची रचना, धरण व कालव्याचे संरक्षण, कालवा फुटीच्यावेळी घ्यावयाची दक्षता, सिंचन व्यवस्थापनाच्या शिस्तीचे पालन, पाणी वापर, पाणी बचतीचे महत्व, पारंपारिक प्रवाही सिंचनामध्ये पाण्याची बचत करण्याचे उपाय, सुक्ष्म सिंचन पध्दतीचे फायदे, उपलब्ध पाण्यामध्ये घ्यावयाची विविध पिके या विषयी मार्गदर्शन करुन जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.

दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने 16 ते 22 मार्च दरम्यान जल जागृती सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. हा सप्ताह साजरा करण्याचा उद्देश हा की, नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने वापर करावा, सिंचनासाठी पाणी वापरासंबंधित कायदे व नियमाबाबत लाभधारकामध्ये माहिती व्हावी. सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी; यासाठी यासप्ताहाचे आयोजन करण्यात असल्याचे त्यानी यावेळी सांगितले. यावेळी उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे श्री.भामरे यांनी पाणी बचत बाबत महत्व विषद केले.

जिल्‍ह्यातील नदीचे पाणी जलकलशात

प्रारंभी जलसप्ताहाच्या निमित्ताने जलदिडींत जिल्ह्यातून वाहणाऱ्या नर्मदा, तापी, शिवण, उदई, नागण, नेसू, रंगावली, देहली, गोमाई या नद्याचे पाणी जलकलशात घेवून जलदिडींत पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा, जीवन वाचवा, जल हे तो कल है, जल संरक्षण, धरती का रक्षण, पाऊस आला मोठा, पाण्याचा केला साठा हे घोषवाक्य सादर करीत जलदिंडीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरापासून सुरु करण्यात येवून पंचायत समिती येथे समारोप करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com