
धुळे : जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या भ्रष्टाचार झाला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. (dhule news agitation against corruption in Jalayukta Shivara)
जलयुक्त शिवार योजनेत २०१६–१७ दरम्यान साक्री (Sakri) तालुक्यातील उंबरटी शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्ट केला. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी धुळे (Dhule) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्यूमाईन क्लबजवळ प्रहार संघटनेच्यावतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले आहे.
तोपर्यंत आंदोलन सुरूच
गेल्या तीन ते चार वर्षापासून या भ्रष्टाचारासंदर्भात ग्रामस्थांतर्फे व प्रहार संघटनेतर्फे वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलन केले आहे. परंतु त्याकडे प्रशासनातर्फे सर्रासपणे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आता जोपर्यंत प्रशासनाचे डोळे उघडत नाही; तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांतर्फे देण्यात आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.