Scheme: पोस्ट ऑफिसची ही स्किम देतेय एफडीपेक्षा जास्त व्याजदर; जाणून घ्या सविस्तर

National Saving Certificate Scheme: आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी सर्वजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिस आणि बँकामध्ये गुंतवणूकीसाठी अनेक योजना असतात.
Post Office Scheme
Post Office SchemeSaam TV
Published On

Post Office National Saving Certificate Scheme Interest:

आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी सर्वजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिस आणि बँकामध्ये गुंतवणूकीसाठी अनेक योजना असतात. पोस्ट ऑफिसमधील राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र(Post Office National Saving Certificate) ही खूप जास्त फायदेशीर आहे. या योजनेवर मिळणारे व्याजदर सरकार ठरवते.

भारत सरकारची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना आहे. या योजनेत नागरिकांना निश्चित परतावा मिळतो. त्यामुळे ही एक सुरक्षित योजना आहे. या योजनेत मिळणारे व्याज हे बँकेच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या योजनेत तुम्हाला जास्त परतावा मिळेल. (Latest News)

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत वित्त मंत्रालय प्रत्येक तिमाहीसाठी व्याज ठरवते. सरकार सध्या या योजनेवर ७.७ टक्के व्याज देत आहे. तर बँकेच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर ७.५० टक्के व्याज दिला जात आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसची ही योजना बँक एफडीपेक्षा जास्त व्याज देत आहे.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही १ हजार रुपयांची गुंतवणूक करु शकतात. या योजनेचा लॉक इन कालावधी पाच वर्षांचा आहे. भारतीय व्यक्ती आपले पैसे या योजनेत जमा करु शकतात.

Post Office Scheme
Save Income Tax: पगाराच्या थकबाकीवर मिळणार कर सवलत, 'अशा' प्रकारे करा अर्ज

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत तुम्ही ऑफलाइन पद्धतीने गुंतवणूक करु शकता. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसला भेट द्यावी लागेल. त्यानंतर राष्ट्रीय बचत योजनेचा फॉर्म भरा. हा फॉर्म पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असेल. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरु शकता. यासाठी तुम्हाला आवश्यक माहिती भरावी लागेल. त्यानंतर गुंतवणूकीची रक्कम जमा करा. त्यानंतर तुम्हाला NSC प्रमाणपत्र जारी केले जाईल.

Post Office Scheme
Smartphone: Galaxy A34 5G स्मार्टफोनवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या किंमत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com