मार्च महिना जवळ येतोय, तसं कर (Income Tax) भरण्याची चिंता देखील वाढत आहे. अनेकजण आता कुठे कर वाचवायचा, कोणत्या विभागात कर वाचणार, कुठे जादा बचत होणार याविषयी माहिती घेत आहेत. अशा लोकांसाठी ही माहिती खूप फायदेशीर ठरणार आहे. तुमचा पगार जर थकलेला असेल, तर त्यावर तुम्हाला तुमचा कर वाचविता येणार आहे. (Maharashtra News)
ज्या आर्थिक वर्षात तुम्ही आयकर रिटर्न भरणार आहात, त्या आर्थिक वर्षात तुम्हाला वाढीव पगाराची रक्कम थकबाकीच्या स्वरूपात मिळाली असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला पगाराच्या थकबाकीवर कर सवलत कशी (How To Save Income Tax) मिळते. त्यासाठी काय प्रक्रिया असते, ते आपण जाणून घेऊ या.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कलम ८९(१) चा फायदा काय
जर तुमचा पगार तुमच्या बँक खात्यात जमा झाला असेल, तर करपात्र उत्पन्न कर मोजणीच्या वेळी बचत वजा करून मोजले जाते. अशा परिस्थितीत, जर तुमच्या पगाराची थकबाकी देखील त्यात जोडली गेली, तर तुमचे करपात्र उत्पन्नात वाढते. पगार जितका जास्त तितके कर दायित्व जास्त असते, तर मग हा कर वाचवायचा कसा ते आपण पाहू ( Save Income Tax On Salary Arrears) या.
यासाठी कलम ८९(१) लागू होतो. यामध्ये तुम्ही पगाराच्या थकबाकीच्या पैशांवर कर सवलत घेऊ शकता. कार्यालयातून प्राप्त झालेल्या फॉर्म-16 मध्ये तुम्हाला एका वर्षात किती पगाराची थकबाकी मिळाली आहे, याची माहिती मिळते. थकबाकीच्या रकमेवर (Salary Arrears) कर वाचवण्यासाठी तुम्हाला फॉर्म-10E भरावा लागेल, यामुळे तुम्हाला आयकर सवलतीचा लाभ मिळेल. या कलमांतर्गत, तुम्हाला तुमचे जुने अडकलेले पैसे मिळाले किंवा अचानक कुटुंब निवृत्ती वेतनाची उर्वरित रक्कम मिळाली तर कर सवलत मिळते.
कर वाचवण्यासाठी अर्ज कसा भरायचा
तुम्हाला पगाराच्या थकबाकीवर किंवा अडकलेल्या पैशांवर आयकर वाचवायचा असेल, तर खालील प्रमाणे अर्ज करा. यासाठी सर्व प्रथम www.incometaxindiaefiling.gov.in वर जा. येथे तुम्हाला 10E फॉर्म भरावा लागेल. आयकर साइटवर लॉग इन करा.
आयकर साइटवर लॉगिन केल्यानंतर तुम्हाला 'ई-फाईल' पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला ड्रॉप डाउन मेनूमध्ये फॉर्म 10E (89 अंतर्गत मदतीसाठी फॉर्म) मिळेल. यानंतर तेथे आवश्यक माहिती भरून पुढे जा. पुढे गेल्यावर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल. त्याच्या पहिल्या टॅबमध्ये अनेक महत्त्वाच्या सूचना असतील. दुसऱ्या टॅबमध्ये तुम्हाला नाव, पत्ता, पॅन क्रमांक यासारखी आधीच भरलेली माहिती मिळेल. यानंतर, ड्रॉप डाउन मेनूमधून निवासी स्टेटरवर जा. येथे तुम्हाला विविध संलग्नक दिसतील, त्यापैकी तुम्हाला पगाराच्या थकबाकीशी (Tax On Salary Arrears) संबंधित एक भरावा लागेल
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.