Scheme For Youth: मोदी सरकारच्या 'चार' योजना, तरुणांना स्वत:चा व्यवसाय करण्याची संधी

Modi Government Scheme: केंद्र सरकारने तरुणांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. पंतप्रधान रोजगार योजनेंतर्गत मोदी सरकार देशातील बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कर्ज सहाय्य देत आहे
Scheme For Youth
Scheme For YouthYandex
Published On

Modi Government Scheme For Youth

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशातील तरुणांना सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी विविध योजना (Modi Government Scheme) सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी आपल्या प्रत्येक भाषणात युवाशक्तीवर भर देतात. देशाला प्रत्येक क्षेत्रात बलशाली बनवण्याचं आवाहनही ते देशातील तरुणांना करतात. (latest marathi news)

मोदी सरकारने गेल्या 9 वर्षांत तरुणांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. ज्यामध्ये पंतप्रधान रोजगार योजना, आत्मनिर्भर भारत योजना, पीएम मुद्रा कर्ज (Scheme For Youth) योजना, पीएम वाणी योजना यांचा समावेश आहे. यातील काही योजना तरूणांना स्वत:चा व्यवसाय करण्याची संधी देतात. आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान रोजगार योजना

मोदी सरकार देशातील बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कर्ज सहाय्य देत आहे. या योजनेद्वारे भारत सरकार तरुणांना प्रशिक्षण देईल आणि त्यांना नवीन व्यवसाय सुरू करण्यास मदत (PM Modi Rojgar Yojna) करेल. ज्यासाठी बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. PMRY कर्ज अंतर्गत प्रशिक्षणासाठी बोलावले जाईल. त्यानंतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, सरकार कर्ज देईल, PMRY कर्ज योजना 2023 च्या नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइट देखील सुरू करण्यात आली आहे.

आत्मनिर्भर भारत योजना

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा परिस्थितीत देशातील तरुणांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत योजना सुरू केली आहे. दोन वेळा यश मिळाल्यानंतर सरकारने पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारत योजना सुरू केली (Modi Government Scheme) आहे. या योजनेंतर्गत नोकरीपासून व्यवसायापर्यंत सर्व क्षेत्रांचा समावेश करून लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. या योजनेचे पॅकेज 20 लाख कोटी रुपये आहे. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Scheme For Youth
Government Scheme: मोदी सरकारची 'पीएम विश्वकर्मा योजना'; कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळतेय ३ लाखांचे कर्ज

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना

पंतप्रधान मोदींनी 8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून लघु उद्योजक व तरुणांना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिले (Mudra Loan Yojna) जाणार आहे. कोणतीही व्यक्ती ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तो प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचे मुद्रा कर्ज मिळवू शकतो.

PM वाणी योजना

आजच्या काळात इंटरनेट ही प्रत्येकाची गरज बनली आहे. त्याचबरोबर भारताला डिजिटल जगात पुढे नेण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करत (PM Modi Vani Yojna) (आहे. यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान वाणी योजना सुरू केली आहे. पीएम फ्री वायफाय योजनेमुळे देशभरात सार्वजनिक वायफाय सेवेचे मोठे नेटवर्क तयार होणार आहे. त्यामुळे जनतेला मोठी मदत होणार आहे. पीएम-वाणी योजनेमुळे लोकांचा रोजगार वाढेल आणि उत्पन्नही वाढेल.

Scheme For Youth
Government Schemes : सरकार देत आहे दरमहा 300 युनिट मोफत वीज, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com