Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! रोज ३३३ रुपये गुंतवा अन् फक्त व्याजातून ५ लाख कमवा

Post Office Recurring Deposite Scheme: पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेतील गुंतवणूक खूप फायद्याची ठरते. या योजनेत फक्त व्याजातून तुम्ही ५ लाख रुपये गुंतवू शकतात.

Siddhi Hande

प्रत्येकाने आपल्या भविष्यासाठी काही रक्कम दर महिन्याला गुंतवली पाहिजे. तुम्ही जर दर महिन्याला छोटी गुंतवणूक केली तर भविष्यात अडचणींच्या वेळी तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांची शिक्षण, लग्न चांगल्या पद्धतीने करु शकतात. यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये तुम्हाला कमीत कमी गुंतवणूकीत तुम्हाला चांगल परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला दिवसाला फक्त ३३३ रुपये गुंतवायचे आहेत. फक्त ३३३ रुपयांची गुंतवणूक करुन तुम्हाला भविष्यात १७ लाख रुपये मिळणार आहेत. फक्त व्याजातूनच तुम्ही ५ लाख रुपये कमावणार आहात.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. याचसोबत या योजनेत कोणत्याही प्रकारची रिस्क नाहीये. त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला दर महिन्याला पैसे जमा करावे लागतील. जर तुम्ही या योजनेत एखाद्या महिन्यात गुंतवणूक केली नाही तर तुम्हाला १ टक्के दंड भरावा लागेल. जर तुम्ही सलग ४ महिने पैसे भरले नाही तर तुमचे खाते बंददेखील होऊ शकते.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत फक्त १०० रुपये गुंतवणूनदेखील तुम्ही अकाउंट उघडू शकतात. या योजनेत जॉइंट अकाउंट उघडण्याचीदेखील सुविधा मिळते. या योजनेत तुम्हाला सध्या ६.८ टक्के व्याज मिळते. याचसोबत चक्रव्याढ व्याजदेखील मिळते.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत जर तुम्ही रोज ३३३ रुपये गुंतवले तर दर महिन्याला जवळपास १०,००० रुपये गुंतवणार आहात. म्हणजेच वर्षाला १.२० लाख रुपयांची बचत करणार आहात. पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्ही ५,९९,४०० रुपये जमा करणार आहे. त्यावर ६.८ टक्के चक्रव्याढ व्याज म्हणजे १,१५,४२७ रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला ७,१४,८२७ रुपये मिळणार आहे.

व्याजातून कमवा ५ लाख रुपये

जर तुम्ही या योजनेत १० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर १२,००००० रुपये गुंतवणार आहात. त्यावर तुम्हाला ५,०८,५४६ रुपये मिळणार आहेत. म्हणजेच १० वर्षानंतर तुम्हाला १७,०८५४६ रुपये मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळली

Viral Video: कारला उडवलं नंतर पोलिसांना चकवा; भरधाव वेगात कॅब चालकाचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ, Video व्हायरल

दाबा लोकशाहीचं बटण, दाबून खा चिकन-मटण, खाटिक समाज आणि काँग्रेसचे हातात कोंबड्या घेऊन निदर्शन | VIDEO

Early signs of liver cancer: शरीरात 'हे' 6 बदल दिसले तर समजा लिव्हर कॅन्सर झालाय; तातडीने डॉक्टरांकडे जा

सिडकोच्या घरांबाबत मोठी बातमी! जम्बो लॉटरी पुन्हा पुढे ढकलली, नागरिकांचा हिरमोड

SCROLL FOR NEXT