Todays Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आज पैशाची गुंतवणूक फायद्याची ठरेल, पाहा राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

अनावश्यक आणि नको असलेल्या गोष्टी आज दिवसभरात वाढतील. डोके गरम राहील.

वृषभ

जोडीदारावर प्रेम वाटेल. साथीने आणि सोबतीने महत्त्वाच्या गोष्टी कराल.

मिथुन

राजकारणामध्ये घोडदौड होईल. ठरवलेल्या गोष्टी नियोजित तशाच झाल्यामुळे मनाला उभारी येईल.

कर्क

लांबच्या प्रवासा मधून फायदा दिसतो आहे. जवळच्या लोकांबरोबर वेळ व्यतित कराल.

सिंह

ठरवलेल्या गोष्टी वेळेत होणार नाहीत. आपला संयम सुटत राहील.

कन्या

काही गोष्टी कोर्टाशी निगडित असतील किंवा महत्त्वाच्या फाईल रेंगाळलेल्या असतील तर त्याची कामे आज सुकर होतील.

तूळ

किडनीशी निगडित आजार होतील, उन्हाळी लागल्यासारखे होईल. पाण्याचा वापर जास्त करावा.

वृश्चिक

दानधर्मामध्ये दिवस व्यतीत करावा असा आहे. पैशाची गुंतवणूक फायद्याची ठरेल.

धनु

घरगुती गोष्टी मध्ये व्यस्त रहाल. कुटुंबीयांना प्राधान्य द्यावे लागेल.

मकर

लेखन, प्रकाशन, प्रिंटिंग या क्षेत्रात भरारी घ्याल. नव्याने एखाद्या व्यवसाय सुरू करणार असल्यास आजचा दिवस चांगला आहे.

कुंभ

जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. दिवस सुखकर आहे.

मीन

दैनंदिन कामे मार्गी लागतील. इतरांवर आपला प्रभाव राहील.

विवाहित महिला गुगलवर काय सर्वाधिक सर्च करतात, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

what married women search on Google | saam tv
येथे क्लिक करा