E Shram Scheme
E Shram SchemeSaam tv

E Shram Scheme: कर्मचाऱ्यांना दर महिन्याला मिळते ३००० रुपयांनी पेन्शन; फक्त 'हे' काम करा

E Shram Card News: केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी ई-श्रम योजना सुरु केली आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांना ३००० रुपयांची पेन्शन मिळते.
Published on

सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजनांमुळे नागरिकांना आर्थिक मदत मिळते. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळते. परंतु जे लोक संघटित क्षेत्रात काम करत नाही त्यांचं काय?त्यांना भविष्यात पेन्शन मिळणार की नाही असा प्रश्न पडलेला असतो. यामुळेच केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी खास योजना राबवली आहे. या कामगारांना ई-श्रम कार्ड दिले जाते.

E Shram Scheme
Government Scheme: पाचवी पास महिलांसाठी खुशखबर! 'या' योजनेमुळे व्हाल स्वावलंबी, कमवाल लाखांच्या घरात

केंद्र सरकारच्या या योजनेत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर ३००० रुपयांची पेन्शन मिळते. याचसोबत व्हिमा कव्हरदेखील मिळतो. यासाठी त्यांना ई- श्रम नावाचे डिजिटल कार्डदेखील दिले जाते.

ई-श्रम कार्ड योजना (E Shram Scheme)

असंघटित क्षेत्रातील लोकांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी, यासाठी योजना राबवली जाते.संघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी ईपीएफएओशी जोडले गेलेले असतात. ईपीएफओमध्ये दर महिन्याला पगारातील काही रक्कम ही पेन्शनसाठी जमा केली जाते. परंतु असंघटित कामगारांसाठी असं काहीच नाहीये. त्यामुळे त्यांच्यासाठी ही योजना राबवली आहे. त्यांना दर महिन्याला ३००० रुपयांची पेन्शन दिली जाते.

ई-श्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.१६ ते ५९ वयोगटातील कामगार या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

E Shram Scheme
SBI Scheme: स्टेट बँकेची ४०० दिवसांची खास योजना! मिळणार भरघोस परतावा; गुंतवणुकीसाठी उरले फक्त ४ दिवस

ई-श्रम कार्ड बनवण्याची प्रोसेस (E Shram Card Application Process)

ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम https://eshram.gov.in/ वेबसाइटवर जावे लागेल.

यानंतर रजिस्टर eShram या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका.

यानंतर विचारलेल्या प्रश्नांची माहिती द्या. त्याचसोबत तुमचा पत्ता आणि शैक्षणिक माहिती द्या.

यानंतर तुम्ही कोणते काम करता याचा पर्याय निवडा. यानंतर फॉर्म भरा.

यानंतर फॉर्म सबमिट केल्यावर तुमचे ई-श्रम कार्ड तयार होणार आहे.

E Shram Scheme
Scheme: पत्नीच्या नावावर १ लाख रूपये गुंतवा अन् मॅच्युरिटीवर ₹१६००० व्याज मिळवा, सरकारी योजनेचा जबरदस्त फायदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com