
जर तुम्ही अशी कोणती योजना शोधत असाल जी तुम्हाला रिटायरमेंट नंतर दर महिण्याला निश्चित उत्पन्न देईल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ही योजना पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे. ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला दरमहा २०,५०० रुपये पेन्शन मिळेल. ही योजना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांना निवृत्तीनंतरही पैशाची चिंता करावी लागणार नाही.
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही निवृत्तीनंतरच्या सुरक्षित उत्पन्नासाठी उत्तम योजना आहे. ही योजना फक्त 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये सध्या आकर्षक व्याजदर मिळतो जो तिमाही आधारावर देण्यात येतो. योजनेची मुदत 5 वर्षांची असून ती वाढवता येऊ शकते. गुंतवणुकीपूर्वी अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात.
रमहा २०,५०० रुपये उत्पन्न होईल
दरमहा २०,५०० रुपये उत्पन्न मिळवण्याची योजना आहे. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवू शकता. ३० लाख गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक सुमारे २,४६,००० रुपये व्याज मिळेल. त्यामुळे दरमहा तुमच्या बँक खात्यात २०,५०० रुपये जमा होतील. या योजनेचा व्याजदर ८.२% आहे. हा व्याजदर सरकारी योजनांमधील सर्वोच्च दरांपैकी एक आहे.
तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल?
योजनेत सध्या ३० लाख रुपयेपर्यंत गुंतवणूक करता येते. यापूर्वी ही मर्यादा १५ लाख रुपये होती. गुंतवणूक एकदाच करावी लागते. एकरकमी दर तीन महिन्यांनी (तिमाही) खात्यात व्याज जमा होते. हे व्याज मासिक खर्चासाठी वापरता येते. ६० वर्षांवरील वरिष्ठ नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वय किमान ६० वर्षे असणे आवश्यक आहे. ५५ ते ६० वयोगटातील निवृत्त व्यक्तीसुद्धा पात्र ठरू शकतात. अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. हे खाते जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडता येते.
करांवर काय परिणाम होईल
योजनेत मिळणाऱ्या व्याजावर कर लागतो. गुंतवलेली रक्कम कलम ८०सी अंतर्गत कर सवलतीस पात्र आहे. १.५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करसवलतीसाठी विचारात घेतली जाते.
योजनेचा कालावधी किती आहे?
ही योजना ५ वर्षांसाठी आहे. ५ वर्षांनंतर ती ३ वर्षांनी वाढवता येते. वेळेपूर्वी पैसे काढता येतात. परंतु त्यासाठी दंड भरावा लागतो.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.