Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: ५००० रुपये गुंतवा अन् ८ लाख मिळवा; पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत होईल फायदाच फायदा

Post Office Recurring Deposit Scheme: पोस्ट ऑफिसरच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. त्याचसोबत चक्रवाढ व्याजदेखील मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. तुमचे भविष्य सुरक्षित व्हावे, सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळावी, यासाठी अनेक योजना आहेत. तुम्ही कमीत कमी गुंतवणूकीत जास्त नफा मिळवू शकतात. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. (Post Office Recrurring Deposite)

या योजनेत तुमचे सुरक्षित असणार आहेत. या योजनेत तुम्ही जेवढे जास्त पैसे गुंतवाल तेवढा जास्त परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही महिन्याला ५००० रुपये गुंतवले तर तुम्हाला ८ लाख रुपये मिळवू शकतात. तसेच तुम्ही महिन्याला १०,००० रुपये गुंतवले तर १६ लाख रुपये तुम्हाला मिळतील. (Post Office Scheme)

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला १०० टक्के परतावा मिळतो. या योजनेत कमीत कमी रुपयांची गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कमीत कमी रुपयांची गुंतवणूक करुन तुमच्याकडे चांगली रक्कम जमा होणार आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे. तुम्ही या योजनेत ५-५ वर्षांचा कालावधी वाढवू शकतात.या योजनेत तुम्ही कमीत कमी १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. तुम्ही जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंकवू शकतात. या योजनेत तुम्हाला ६.७ टक्के व्याज मिळते. तसेच चक्रवाढ व्याजदेखील मिळणार आहे.

या योजनेत तुम्ही सिंगल आणि जॉइंट अकाउंटदेखील उघडू शकतात. जर तुम्ही दर महिन्याला ५ हजार रुपये गुंतवले तर १० वर्षांना तुम्हाला ८,५४,२७२ रुपये मिळणार आहे. या योजनेत चक्रवाढ व्याज हे तिमाही आधारावर दिले जाते.

या योजनेत जर तुम्ही दर महिन्याला पैसे जमा केले नाही तर १०० रुपयांमागे १ रुपये दंड भरावा लागेल. त्यामुळे या योजनेत दर महिन्याला गुंतवणूक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tushar Apte : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपचा स्वीकृत नगरसेवक

Shocking : "तुला पाळी आली असेल तर पुरावा दाखव", शिक्षिकेची अपमानास्पद वागणूक, विद्यार्थिनीचा मृत्यू; सरकारी कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

Pooja Sawant Mangalsutra: मराठमोळा साज! हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग लांब मंगळसूत्राचे पॅटर्न

Yuzvendra And Dhanashree: डिव्होर्सनंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा येणार एकत्र; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, बहीण-भाऊ अन् बापाचा होरपळून मृत्यू, गाढ झोपेत असतानाच....

SCROLL FOR NEXT