Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Post Office RD Scheme: पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळणार आहे. तुमच्या व्याजावरदेखील व्याज मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येकाने आपल्या भविष्यासाठी आर्थिक बचत करायला हवी. तुम्ही दर महिन्याला एक ठरावीक रक्कम बाजूला काढून ठेवायला हवी. तुम्ही ही रक्कम काढून वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक करु शकतात. पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिटध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला लाखो रुपयांचा परतावा मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्ही १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. तुम्ही कमीत कमी रक्कम गुंतवून या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत जर तुम्ही दर महिन्याला ५०,००० रुपये गुंतवले तर तुम्हाला लाखो रुपयांचा परतावा मिळू शकतो. ५ वर्षांसाठी ३० लाख रुपये जमा होणार आहे. यावर तुम्हाला जवळपास ५ लाख रुपयांचे व्याज मिळेल.हे व्याज मिळून तुमच्याकडे ३५ लाख रुपये जमा होऊ शकतात.

पोस्टाची ही योजना एकदम सुरक्षित आहे. या योजनेत तुम्हाला गॅरंटीड परतावा मिळतो. शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडसारखी कोणतीही जोखीम या योजनेत नाही. या योजनेत मिळणारे व्याजदरदेखील निश्चित असते. त्यामुळे तुमची गुंतवणूक ही एकदम सुरक्षित असते.

जर तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर १ वर्षानंतर तुम्ही जमा रक्कमेतील ५० टक्के रक्कम लोन म्हणून घेऊ शकतात. यामध्ये तुम्ही अकाउंट बंद न करता पैसे काढू शकतात.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत अजून अनेक फायदे आहेत. या योजनेत तुम्हाला १.५ लाख रुपयांपर्यंत टॅक्स सूट मिळेल. या योजनेत तुम्ही गुंतवणूकीवर टॅक्स वाचवू शकतात. याचसोबत तुम्हाला जास्त परतावादेखील मिळणार आहे. त्यामुळे पाच महिन्यात तुमच्याकडे लाखो रुपये असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT