ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजपासून दिवाळी या सणाला सुरूवात झाली आहे. घरोघरी दिवाळी या सणाची लगबग सुरू आहे.
दिवाळी हा प्रकाशाचा, विजयाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो.
दिवाळीत घरोघरी मातीचे दिवे लावले जातात. सकाळ व संध्याकाळ मातीचे दिवे लावतात.
दिवाळीत मातीचे दिवे का लावले जातात यामागचे कारण तुम्हाला माहितीये का?
दिवाळीत मातीचे दिवे लावण्याची जुनी परंपरा आहे जी आजही तशीच सुरू आहे.
दिवाळीत मातीचे दिवे लावणे हे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे.
मातीचे दिवे नैसर्गिक असल्याने पर्यावरणास अनुकूल म्हणून हे दिवे वापरले जातात.
दिवाळीत दिवे लावल्याने घरात सकारात्मकता राहते जीवनातील अंधार दूर होतो.