Manasvi Choudhary
आजकाल हवामान बदलामुळे गंभीर आजारांनी डोकं वर काढलं आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांना कोणालाही न्यूमोनिया हा आजार उद्भवत आहे.
न्यूमोनिया झाल्यास रूग्णांला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येते. न्यमोनिया हा एक गंभीर आजार आहे.
न्यूमोनिया हा फुफ्फुसाचा संसर्ग आहे जो बॅक्टेरिया आणि विषाणूमुळे होतो. न्यूमोनिया आजारात फुफ्फुसात सूज येते यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो.
न्यूमोनियाचे अनेक प्रकार आहेत. सौम्य आणि गंभीर अशी लक्षणे आहेत.
सतत खोकला येणे हे न्यूमोनिया आजाराचे प्रमुख लक्षण आहे.
न्यमोनिया झाल्यास तुम्हाला सतत अशक्तपणा थकवा जाणवतो. चेहऱ्यावर तेज राहत नाही.
न्यूमोनिया झालेल्या रूग्णाला खोकला, ताप आणि घाम येतो तसेच थंडी भरून येते.
न्यूमोनिया झाल्यास श्वास घ्यायला त्रास होतो व घसा कोरडा पडून खोकला सुरू होतो.