Manasvi Choudhary
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाते.
सोनालीने अत्यंत कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
तिचं अभिनय आणि सौंदर्य याविषयी कायमच चाहत्यांना उत्सुकता असते.
सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच तिने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
सोनालीने मराठमोळ्या अंदाजात खास साडी परिधान केली आहे. तिने साजश्रृंगार देखील केला आहे.
कपाळी टिकली, गळ्यात हार, कानातले, हातात बांगड्या असा तिचा लूक आहे. सोनालीने स्टायलिश अंदाजात साडीवर ब्लाऊज परिधान केला आहे.
सोशल मीडियावर सोनालीचे फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या फोटोंना प्रतिक्रिया येत आहेत.