पीएम स्वनिधी योजना
बिझनेस सुरु करण्यासाठी राबवली योजना
नागरिकांना मिळतात ८०,००० रुपये
तीन हप्त्यांमध्ये दिले जातात पैसे
रस्त्यावरील फूड विक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांसाठी योजना
सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.आर्थिकदृष्ट्या कमजोर नागरिकांसाठी सरकारने एक योजना सुरु केली आहे. अनेक तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा असतो परंतु त्यासाठी भांडवल नसते. त्यामुळेच सरकारने पीएम स्वनिधी योजना सुरु केली आहे. या योजनेत नागरिकांना व्यवसायासाठी लोन दिले जाते.
कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार लोन (Get Business Loan Without Guarantee)
पीएम स्वनिधी योजना ही मायक्रो क्रेडिट योजना सुरु केली आहे. या योजनेत तुम्हाला ८०,००० रुपये दिले जातात. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये दिले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत मिळणाऱ्या लोनवर कोणतेही गॅरंटी द्यावी लागत नाही.
बिझनेसासाठी मिळतात ८०,००० रुपये (Get Business Loan 80,000 Rupees)
कोरोना काळात स्वनिधी योजना (PM Svanidhi Yojana) सुरु करण्यात आली होती. नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी योजना सुरु केली आहे. रस्त्यावर भाजी विक्रेत्यांना किंवा स्टॉलवर काही वस्तू विकणाऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत व्यवसाय वाढवण्यासाठी पैसे दिले जातात. सुरुवातीला १००००, नंतर २०,००० रुपये दिले जातात. तिसऱ्या हप्त्यांमध्ये ५०,००० रुपये दिले जातात.
पीएम स्वनिधी योजनेत तुम्ही जेव्हा अर्ज करता त्यानंतर तुम्हाला १०,००० रुपये दिले जातात. हे कर्ज फेडल्यानंतर २०,००० रुपये दिले जातात. यानंतर ते पैसे परत केल्यानंतर ५०,००० रुपये दिले जातात. या योजनेत ज्या वर्षी तुम्ही लोन घेतात. त्याचवर्षी हे पैसे द्यावे लागतात. या योजनेत परत करण्यासाठी ईएमआयचा पर्याय असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.