PM Svanidhi Yojana: सरकार देतंय गॅरंटशिवाय ८०००० रुपयांचं कर्ज; पीएम स्वनिधी योजना नेमकी आहे तरी काय?

PM Svanidhi Yojana For Businesss: स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर सरकार तुम्हाला कोणत्याही गॅरंटीशिवाय कर्ज देत आहे.पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत तुम्हाला ८०,००० रुपयांचे कर्ज मिळेल.
PM Svanidhi Yojana
PM Svanidhi YojanaSaam Tv
Published On

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारच्या या योजनांमध्ये आर्थिक मदत मिळते. महिला, शेतकरी ते स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना या योजनांमध्ये आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारच्या अशीच एक योजना म्हणजे पीएम स्वनिधी योजना.

पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत तुम्हाला ८०,००० रुपयांचे कर्ज मिळते.तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. केंद्र सरकारच्या या योजनेत तुम्हाला कोणत्याही गॅरंटीशिवाय लोन मिळते. बिझनेस सुरु करण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कर्द देते. (PM Svanidhi Yojana)

PM Svanidhi Yojana
LIC Scheme : फायदाच फायदा! दररोज ४५ रुपये भरा अन् २५ लाख मिळवा, LIC ची भन्नाट योजना

कोरोना काळात ही पीएम स्वनिधी योजना सुरु केली होती. या योजनेत तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तारण ठेवण्याची गरज नाही. पीएम स्वनिधी योजनेत तुम्हाला ८०,००० रुपये मिळतात. या योजनेत सर्वात आधी १०,००० रुपये दिले जातात. त्यानंतर २०,००० रुपये दिले जातात. यानंतर ५०,००० रुपये दिले जातात. (PM Svanidhi Yojana For Business)

या योजनेत रस्त्यावरील भाजीविक्रेते, फळविक्रेते किंवा फास्ट फूड विक्रेते यांना कर्ज दिले जाते. या योजनेत तुम्ही सर्वप्रथम १०,००० रुपये मिळवू शकतात.हे १०,००० रुपये परत केल्यावर तुम्हाला परत २०,००० रुपयांचे लोन मिळणार आहे. यानंतर हे पैसे परत केल्यावर तुम्हाला ५०,००० रुपयांचे लोन मिळणार आहे.

पीएम स्वनिधी योजनेत घेतलेल्या कर्जाची रक्कम तुम्हाला १ वर्षाच्या आत परत करायची आहे. या योजनेत तुम्ही जर वेळेवर रक्कम परत केली तर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे फक्त आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

PM Svanidhi Yojana
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करा अन् महिन्याला ९२५० मिळवा; जाणून घ्या सविस्तर

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. या योजनेत लोनच्या व्याजावर सरकार सब्सिडीदेखील देते.

PM Svanidhi Yojana
PPF Scheme: वर्षाला १.५ लाख गुंतवा अन् १ कोटी रुपये मिळवा, सरकारच्या या योजनेत कोणत्याही रिस्कशिवाय भरघोस परतावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com