Government Scheme: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! सरकारची 'ही' जबरदस्त योजना, खात्यात जमा होणार ३६००० रुपये

PM Kisan Mandhan Yojana: देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने पीएम किसान मानधन पेन्शन योजना -पीएम किसान योजनेसोबत जोडली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. त्यांच्या खात्यात ३६००० रुपये जमा होणार आहेत.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On

Summary -

  • पीएम किसान योजनेशी जोडलेली पेन्शन योजना आता उपलब्ध.

  • ६० व्या वर्षानंतर दरमहा ३,००० आणि दरवर्षी ३६,००० रुपये खात्यात जमा.

  • नोंदणीसाठी कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे लागणार नाहीत.

  • नोंदणीसाठी फक्त सार्वजनिक सेवा केंद्राला भेट द्या.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही आधीच पीएम किसान योजनेत नोंदणीकृत असाल तर तुम्हाला सरकारच्या आणखी एका उत्तम योजनेचा लाभ घेता येणार आहे. सरकारने पीएम किसान मानधन पेन्शन योजना -पीएम किसान योजनेसोबत जोडली आहे. म्हणजेच तुम्हाला पेन्शन मिळविण्यासाठी कोणतेही अतिरक्त कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात दहमहा ३००० रुपये याप्रमाणे वर्षाला ३६००० रुपये पेन्शन मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या खिशातून एक रुपयाही द्याव लागणार नाही. पीएम किसान योजनेच्या वार्षिक ६००० रुपयांच्या मदतीने मासिक योगदान डायरेक्ट कापले जाणार आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: कामाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता

योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा किती?

पंतप्रधान किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना विशिष्ट वयोमर्यादा ठरुण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे वय १८ ते ४० वर्षांदरम्यान असणे गरजेचे आहे. या योजनेत एकदा नोंदणी करा. त्यानंतर तुमचे वय ६० वर्षे झाल्यानंतर तुम्हाला दहमहा ३००० रुपयांचे पेन्शन थेट तुमच्या खात्यात मिळणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला संपूर्ण वर्षात ३६००० रुपये मिळतील. हे पेन्शन तुम्हाला आयुष्यभर मिळत राहिल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर सरकार तुम्हाला एक विशेष पेन्शन आयडी क्रमांक देईल. जो नंतर तुमच्या ओळखीसाठी उपयुक्त ठरेल.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा हप्ता शनिवारी येणार, त्याआधी हे काम करा अन्यथा मिळणार नाही २००० रुपये

कशी नोंदणी कराल?

या योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याला फक्त त्याच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जावे लागेल. तिथे त्याला आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो घ्यावा लागेल. सार्वजनिक सेवा केंद्र ऑपरेटर तुमच्या कागदपत्रांच्या आधारे ऑनलाइन फॉर्म भरेल. एक ऑटो-डेबिट फॉर्म देखील भरला जातो जेणेकरून मासिक योगदान थेट बँक खात्यातून कापले जाईल. जर तुम्ही आधीच पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ही योगदान रक्कम त्याच मदतीतून आपोआप कापली जात राहिल.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: ९.७ कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज ₹२००० खात्यात जमा झाले; पैसे आले की नाही असं करा चेक

कसा लाभ मिळेल?

पीएम किसान योजनेच्या पैशातूनच तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. या पेन्शन योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या खिशातून पैसे द्यावे लागत नाही. जर एखादा शेतकरी वयाच्या ४० व्या वर्षी या योजनेत नाव नोंदवतो. तर त्याला दरमहा जास्तीत जास्त २०० रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच वर्षाला २,४०० रुपये. जे थेट पंतप्रधान किसान योजनेच्या रकमेतून कापले जातात. उर्वरित ३,६०० रुपये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. या योजनेमधून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळतो.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना २००० नव्हे तर ७००० मिळाले; तुम्हाला आले का? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com