PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv

PM Kisan Yojana: ९.७ कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज ₹२००० खात्यात जमा झाले; पैसे आले की नाही असं करा चेक

PM Kisan Yojana Money Deposite Or Not: पीएम किसान योजनेचा आज २०वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. दरम्यान, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की अशा पद्धतीने चेक करा.
Published on

केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठीची पीएम किसान सन्मान निधी योजना लोकप्रिय आहे. पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत १९ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. त्यानंतर आज पुढचा २००० रुपयांचा हप्ता मिळणार आहे.

जवळपास ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकी २००० रुपये दिले जाणार आहे. जवळपास २०,५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे. आज हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे २००० रुपये जमा झाले की नाही? अशा पद्धतीने करा चेक

पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले की नाही? (PM Kisan YojanaMoney Deposite Or Not)

पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाला की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

बँकेच्या अॅपवर जाऊन करु शकतात

तुमच्या खात्यात आज पैसे जमा केले की तुम्हाला पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज येईल. त्यावरुन तुम्हाला समजेत तुम्हाला पैसे आलेत की नाही. याचसोबत तुम्ही बँकेच्या अधिकृत अॅपवर जाऊन बघू शकतात. तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता आला की नाही हे समजेल.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ४००० रुपये; मिळणार डबल फायदा

पीएम किसान योजनेचा स्टेट्‍स कसा बघायचा? (How To Check PM Kisan Yojana Status)

तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

त्यावर जाऊन बेनिफिशियरी स्टेट्सवर क्लिक करा.

यानंतर बँक अकाउंटशी लिंक आधार नंबर टाका.

यानंतर डेटावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी स्टेट्‍स पाहायचा आहे.

यानंतर पेमेंट स्टेट्सवर क्लिक करा

तुम्हाला तुमच्या पेमेंटचा स्टेट्‍स दिसेल.

ऑफलाइन पद्धत

तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेही पीएम किसान योजनेचे पैसे आले की नाही चेक करु शकतात.तुम्ही बँकेत जाऊन बॅलेंस चेक करु शकतात. याचसोबत पासबुक एन्ट्री करुन पैसे जमा झाले की नाही चेक करु शकतात.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा हप्ता शनिवारी येणार, त्याआधी हे काम करा अन्यथा मिळणार नाही २००० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com