Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी कशी करावी? जाणून घ्या आवश्यक स्टेप्स, वेबसाइट

Dhanshri Shintre

अमरनाथ यात्रा

जर तुम्हालाही श्री अमरनाथ यात्रेत सहभागी व्हायचे असेल, तर 2025 ची नोंदणी प्रक्रिया कशी करायची ते जाणून घ्या.

यात्रा निवास

तात्काळ नोंदणीसाठी जम्मूमधील यात्रा निवास 1 जुलैपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत, सुविधा उपलब्ध आहेत.

निवासाची सुविधा

राहण्याची पूर्वतयारी केल्यास, तुम्हाला शहरातील विविध मंदिरे आणि हलगाम, बालताल छावण्यांमध्ये निवासाची सुविधा सहज मिळू शकते.

पाच नोंदणी केंद्र

आधार कार्डसह शहरातील कोणत्याही पाच नोंदणी केंद्रांवर जाऊन नोंदणी करता येईल.

वेबसाइटला भेट द्या

ऑनलाइन नोंदणीसाठी अमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि आवश्यक माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.

वेबसाइटवर लॉगिन

अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून फॉर्म भरावा लागेल, ज्यात मार्ग, प्रवास तारीख आणि मोबाईल नंबर भरावा लागतो.

नोंदणी फी

ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी, आधी मोबाइलवर आलेला OTP एंटर करा आणि नंतर ₹220 नोंदणी फी भरून प्रक्रिया पूर्ण करा.

वैद्यकीय प्रमाणपत्र

अमरनाथ यात्रेसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे, जे स्थानिक रुग्णालयातून घेणे बंधनकारक आहे प्रवासासाठी. अन्यथा परवानगी मिळत नाही.

NExt: पावसाळा संपत आलाय! कोल्हापूरातील 'हा' निसर्गरम्य धबधबा अजूनही पर्यटकांना भुरळ घालतोय, एकदा भेट द्याच


येथे क्लिक करा