Waterfall: पावसाळा संपत आलाय! कोल्हापूरातील 'हा' निसर्गरम्य धबधबा अजूनही पर्यटकांना भुरळ घालतोय, एकदा भेट द्याच

Dhanshri Shintre

कोल्हापूर

गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धबधबे आता पूर्ण क्षमतेने वाहत आहेत.

गगनबावडा भुदरगड

विशेषतः राधानगरी गगनबावडा भुदरगड या तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात असलेले अनेक प्रसिद्ध धबधबे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

निसर्गाने नटलेला धबधबा

भुदरगड धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात वसलेला एक अप्रतिम निसर्गाने नटलेला धबधबा आहे.

भुदरगड धबधबा

मात्र भुदरगड तालुक्यातील भुदरगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या चोपडेवाडी गावातील एक अपरिचित धबधबा पर्यटकांना खुणावतो आहे.

सौंदर्य

मान्सूनमध्ये हा धबधबा पूर्ण जलप्रपाताच्या रूपात वाहतो आणि त्याचे सौंदर्य पाहून पर्यटक भारावून जातात.

अंतर किती?

धबधबा पाहण्यासाठी कोल्हापूरहून ६०-७० किमी अंतर पार करावे लागते, जे बाइक आणि कारने सहज करता येते.

ट्रेकिंगचा आनंद

धबधब्याजवळ बरीचशी मोकळी जागा असल्यामुळे मित्रांसोबत पिकनिक, फोटोग्राफी आणि ट्रेकिंगचा आनंद घेता येतो.

सुरक्षितता बाळगा

पावसाळ्यात रस्ता थोडा निसरडा होतो, त्यामुळे ट्रेकिंग करताना योग्य चपला व सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे.

NEXT: वीकेंड ट्रिपसाठी सर्वोत्तम! पनवेलमधील 'या' नयनरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या

येथे क्लिक करा