'भारत कधीही तडजोड करणार नाही'; ट्रम्पच्या टॅरिफवर पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

India Reacts Strongly to US Tariffs: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% आयात कर लादला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiX
Published On
Summary
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% आयात कर लादला आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

  • रशियाकडून तेल आयात केल्यामुळे अमेरिकेनं भारतावर आर्थिक दबाव टाकला आहे.

  • भारत सरकारने शेतकरी, पशुपालक व मच्छीमारांच्या हितासाठी तडजोड न करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आयातीवर ५० टक्के अतिरिक्त कर लावून धक्कातंत्राचा अवलंब केला. भारतीय वस्तूंवर मोठ्या प्रमाणात शुल्क वाढवून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. यावर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत अमेरिकेला संदेश दिला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'भारत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. मला वैयक्तिकरित्या माहित आहे की, मला यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल. परंतु यासाठी मी तयार आहे. भारत आपल्या शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या कल्याणासाठी मी प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास तयार आहे'. असे नरेंद्र मोदी म्हणाले.

रशियाकडून भारताच्या तेल आयातीला प्रतिसाद म्हणून अमेरिकेनं अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफ टॅक्सच्या निर्णयावर पंतप्रधान मोदींनी हे विधान केलं आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला.

PM Narendra Modi
डोनाल्ड ट्रम्पकडून भारताला धक्क्यांवर धक्के! ५० % कर लादल्यानंतर आता आणखी एक नवा इशारा

'इतर देशही त्यांच्या राष्ट्रीय हितासाठी रशियन तेलाची आयात करत आहेत, अशा परिस्थितीत भारतावरच दंडात्मक कारवाई का? हे भेदभावपूर्ण आहे,' असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच 'भारतीय राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील,' असा पुनरुच्चारही परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

PM Narendra Modi
सोन्याच्या दराला चकाकी; २४ कॅरेट सोन्याचा भाव किती? वाचा आजचे लेटेस्ट दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com