

शिरपूर पोलिसांनी अतिशय वेगाने तपास करत चोरीच्या एका गुन्ह्याचा छडा लावला आहे, बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका प्रवाशाचे 50 हजार रुपये चोरणाऱ्या एका 62 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अवघ्या 4 तासांत अटक केली आहे, विशेष म्हणजे चोरीला गेलेली सर्व रक्कम पोलिसांनी आरोपीकडून परत मिळवली असून, या तत्पर केलेल्या कारवाईबद्दल शिरपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे,
धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे, तर जवळपास 30 ते 35 फूट उंचीवर या पाईपलाईन फुटल्याने पाण्याचे फवारे उडत असून, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वर्षी गावाजवळ ही मुख्य पाइपलाइन फुटली आहे,
आणि पाइपलाईन फुटल्याने 30 ते 35 फुट उंच पाणी उडून थेट पाणी महामार्गावर पडत आहे, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी थेट रस्त्यावर पडत असल्यामुळे याचा थेट परिणाम मुंबई आग्रा महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर होत आहे, पाईपलाईन फुटण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखील बहुतांश वेळा ही पाईपलाईन अशाच प्रकारे फुटून लाखो लिटर पाणी सर्रास वाया गेले आहे, आणि यावर कायमस्वरूपीचा उपाय करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांतर्फे करण्यात येत आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या महापौर अणि उपमहापौर पदाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. उद्या सकाळी 11 चा सुमारास पालिका सचिवांकडे अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यंदाचे पालिकेचे महापौर पद अनुसूचित जाती साठी राखीव आहे. सेनेच्या वतीने विमल भोईर.. डॉ ..दर्शना जानकर अणि शर्मिला गायकवाड यांची नाव चर्चेत आहेत.
अमृता फडणवीस यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी गायिका अंजली भारती यांचेकडून दिलगिरी व्यक्त
चुकून अनावधानाने तो शब्द उच्चारण्यात आल्या"चा अंजली भारती यांचा दावा
सोशल माध्यमांवर अंजली भारती यांच्याकडून केलेल्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त.
सदस्य रेल्वे बोर्ड पायाभूत सुविधा पदावर विवेक कुमार गुप्ता यांची बदली
गुप्ता यांच्याकडे मध्य रेल्वेचा देखील अतिरिक्त कार्यभार होता.
तत्कालीन महाव्यवस्थापक विजय कुमार यांच्या मृत्यू नंतर गुप्ता यांच्याकडे मध्य रेल्वेची देखील जबदारी देण्यात आली होती.
पुण्यावरून नागपूरकडे जाणारी ट्रॅव्हल्स समृध्दी महामार्गावरील गणेशपूर शिवारात अडवून चंद्रपूर येथील नगरसेवक, त्यांची पत्नी, इतर नगरसेवक व मित्रांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.
अंकुश काकडे यांनी सांगितले की, आज मला राहून राहून दुःख होत आहे की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अजितदादा यांनी 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी माझ्याकडे आग्रह केला होता
महापालिका निवडणुकीत आम्ही एकत्र आलो होतो काही प्रमाणावर आम्हाला यश आलं
१२ डिसेंबर रोजीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या पण तसं झालं नाही
अजित दादा यांच्या हयातीत दोन पक्ष एकत्र आले नाहीत ही खंत आज ही माझ्या मनात आहे
बारामती -
बारामतीमधील सहयोग सोसायटीमध्ये असलेल्या अजित पवारांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार आणि त्यांचे कुटुंबीय आहेत
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षासह विविध मान्यवर हे सांत्वन पर भेटीसाठी येऊन गेले आहेत
जयंत पाटील, अनिल देशमुख, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील यासह अनेक जणं सांत्वन पर भेट देऊन गेले आहेत
सध्या सहयोग सोसायटी मध्ये असलेल्या निवासस्थानी पवार कुटुंबीय आहेत
अजित पवारांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले
पुणे -
उपमुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठला ही प्रस्ताव तयार झालेला नाही, विश्वसनीय सूत्रांची माहिती
काही लोकांच्या काही भावना असल्या तरी याबद्दल पक्षात कुठली ही अधिकृत चर्चा नाही, सूत्रांची माहिती
कुठली ही चर्चा किंवा याबाबत बैठक नसल्याने कुठल्या ही प्रकारचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून तयार झालेला नसल्याची माहिती
शहापूर-
- लाल बावटा लाँग मार्च अखेर माघारी, मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने तोडगा
- वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी, समुद्राला वाहून जाणारे पाणी स्थानिकांसाठी तसेच महाराष्ट्रातल्या कोरडवाहू भागासाठी वापरावे, पेसा भरती सुरू करून रोजगार उपलब्ध करावा, आदी मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काढलेल्या लाँग मार्चच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वर्षा या निवासस्थानी मंगळवारी सकारात्मक चर्चा झाली होती. हा मोर्चा काल मुंबईच्या सीमेवर भातसा नगर फाटा येऊन धडकला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.. रत्नागिरी तालुक्यातील फणसोपमध्ये देखील शिवसैनिकांनी एकत्र येत अजित दादांना श्रद्धांजली वाहिली.. शिंदे सेनेचे युवा तालुकाप्रमुख तुषार साळवी, गोळप जिल्हा परिषद गटातील उमेदवार नंदकुमार मुरकर, भाट्ये पंचायत समिती गणातील उमेदवार ऍड. अर्चना साळवी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती.
अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात निधन
आज अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
अंत्यसंस्कारानंतर NDRF ची टीम घटनास्थळी दाखल
किसान सभेच्या मोर्च्याला स्थगिती आज नाशिक जिल्हाधिकारी याच्या उपस्थित स्थगती मिळाली असून लाल वादळ थांबले आहे .
मागण्यांची पूर्तता करण्यासाठी तीन महिन्याची मुदत मागण्यात आली असून या मुदतीत किसान सभेच्या समीती सोबत अनेक बैठकी होणार आहेत .
अमरावतीचे माजी महापौर चेतन गावंडे हे अमरावती महानगरपालिकेत भाजपचे गटनेते म्हणून निवड..
माजी महापौर चेतन गावंडे साईनगर प्रभागातून दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत. त्यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या गटनेतेपदी निवडीमुळे मनपातील भाजपाची ताकद अधिक वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पक्ष कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या निवडीबद्दल उत्साहाचे वातावरण आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातात निधन झाल्याने अख्खा महाराष्ट्र हादरा,नाशिकच्या येवल्यातील भुजबळ कार्यालयात काल पासून सन्नाटा पसरला होता.त्यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत आज येवल्यात बंद पाळण्यात आला तर छगन भुदबळ संपर्क कार्यालया जवळ जेष्ठ नेते अंबादास बनकर तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अजित पवार यांना श्रध्दांजली वाहिली यावेळी कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.अजित पवार यांचे येवल्यातील जेष्ठ पदाधिकारी अंबादास बनकर यांच्याशी गेल्या चाळीस वर्षां पासून ऋणानुबंध असल्याचे सांगत त्यांना गहिवरुन आले.
वाघोलीतील बायफ रोडवरील घटना, चालक अटक
मद्यधुंद स्कूल बस चालकाने चार दुचाकी व एका कारला ठोकरून काही अंतर फरफटत नेल्याची घटना काल दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील बायफ रोडवर घडली.
यावेळी बस मध्ये ३० ते ४० मुले होती. नागरिकांनी ओरडा ओरडा करून बस थांबविली. यानंतर चालकाला दुचाकी ठोकरल्याचे कळाले.
सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
बत्ता वसंत रसाळ ( वय ५० वर्षे, रा.वाघोली ) असे अटक केलेल्या बस चालकाचे नाव आहे.
दोन दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर तालुका आणि शिंदखेडा तालुक्यातील विविध ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी त्याचबरोबर टरबूज, पपई, केळी अशा बहुतांश पिकांचं या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे,
बारामतीत काल झालेला विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे दुःखद निधन झालं... या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नाशिकमध्ये देखील अतिशय शोकाकुल वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे... नाशिक जिल्ह्यात अजित दादा यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे.त्यामुळे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. तसेच अनेक गावांमध्ये नागरिकांनी दैनंदिन व्यवहार देखील पूर्णपणे बंद ठेवले आहेत. नाशिकच्या बाजार समितीने आज दिवसभर सर्व लिलाव आणि बजाज समिती प्रक्रिया बंद ठेवत अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
जळगाव जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झाला असून हजारो हेक्टर वरील पिकांचा मोठा नुकसान झाला आहे यात शेतकऱ्यांच्या गहू हरभरा ज्वारी दादर या पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हा हिरावून गेल्यामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे असोदा येथील शेत शिवारातून आमचे प्रतिनिधी संजय महाजन जळगाव यांनी आढावा घेतला आहे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल अपघाती निधन झाले या निधनाची बातमी समजताच शोकाकुल वातावरण झाले होते, काल दुपारी सर्वपक्षाच्या वतीने चिखली बंदीची हाक देण्यात आली होती, या हाकेला प्रतिसाद देत आज व्यापारी बांधवांनी चिखली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे.शहरात शांतता व शिस्तबद्ध वातावरण दिसून आले... महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले यामुळे महायुतीच्या वतीने काल चिखली बंद करण्यासाठी आमदार श्वेता महाले आणि राष्ट्रवादीचे नेते शंतनु बोंद्रे यांनी सर्वपक्षीय बंदची हाक दिली होती सकाळपासून चिखलीत सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला व्यापाऱ्यांनी चिखली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मात्र उघडी ठेवण्यात आली आहेत.
नाशिकच्या लासलगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकसभा आयोजित करण्यात आली,यावेळी विविध सामाजिक, राजकीय संघटनांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली,शोक व्यक्त करण्यासाठी शहरातील व्यापारी व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आस्थापने बंद ठेवली होती.शोक सभेत अजित पवार यांच्या कार्याचा उपस्थितांनी गौरव करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून, गहू व मका पिकेही आडवी पडली आहेत. काही भागात पावसामुळे शेतात पाणी साचल्याने उभ्या पिकांचे अधिक नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले असून, आधीच वाढत्या खर्चामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. प्रशासनाने लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागाचा आढावा घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत
राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातात दुःखद निधन झालं, त्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुपारपर्यंत शहरात कडकडीत बंद पाळला आहे, शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत,
काल विमान दुर्घटनेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अजित दादा यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यामध्ये एकच हळहळ पसरली आहे, राज्यात विविध ठिकाणी बंद पाडून आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली सर्वसामान्य नागरिकांतर्फे वाहण्यात येत आहे, धुळ्याच्या शिंदखेडा येथे देखील बंद पाळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिंदखेडा येथील नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. पीएम मोदींनी संसदेतून देशाला संबोधित केले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे खूपच थंडीचे वातावरण आहे.
राष्ट्रवादीचे नेते उमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे काल विमान दुर्घटनेत निधन झाल्याने संपुर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला,अजित दादांच्या निधनाने नाशिकच्या येवला शहरात आज व्यापारी महासंघ,हॉटेल महासंघाने त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी दुपारी १२ वाजे पर्यंत बंद पाळण्यात येत असून येवलेकर नागरीकांनी कडकडीत बंद पाळत श्रध्दांजली अर्पण केलीय.
अजित पवारांच्या अंत्यदर्शनाला काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे दाखल झाले आहेत. ते थोड्याच वेळात अजित पवारांचे अंत्यदर्शन घेणार आहे.
कर्नाटकमध्ये प्रायव्हेट बसला आग
बसमध्ये ३६ जण होते
१०जण जखमी
माघी शुध्द जया एकादशी निमित्ताने आज पहाटे मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी सदस्या शकुंतलाताई नडगिरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, लेखाधिकारी मुकेश अनेचा व विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते.
आज माघी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक आज पंढरपुरात दाखल झाले आहेत.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे वारीवर काही प्रमाणात सावट असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी रात्री उशिरा फलटण जवळच्या तरडगाव येथे अंत्यसंस्कार
काल बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये अजित पवार यांचे सोबत विदीप जाधव प्रवास करत होते...
रात्री साडे अकराच्या सुमारास तरडगावच्या पालखी स्थळावर त्यांच्यावर झाले अंत्यसंस्कार
तरडगाव मध्ये रात्री उशिरा पार्थिव पोहोचल्यानंतर अंत्ययात्रा काढून अंत्यविधीच्या ठिकाणी त्यांना पोलीस सलामी देऊन दिला अखेरचा निरोप
विदीप जाधव यांच्या जाण्याने पोलीस दल कुटुंबीय त्यांचा मित्रपरिवार गावावर मोठी शोककळा
हिमाचल प्रदेशात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार बर्फवृष्टी आणि पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्य आपत्ती निवारण केंद्राच्या (SEOC) अहवालानुसार, राज्यात ४ राष्ट्रीय महामार्गांसह एकूण ८८५ रस्ते बंद झाले आहेत. बर्फवृष्टीमुळे ३,२३७ वीज ट्रान्सफॉर्मर ठप्प झाले असून १२१ पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे हजारो घरांचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला आहे.
शिमला, कुल्लू, लाहुल-स्पीती आणि किन्नौर या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. एकट्या शिमला जिल्ह्यात १७६ रस्ते बंद आहेत. लाहुल-स्पीतीमध्ये २९० रस्ते बंद झाल्याने अनेक भाग संपर्कहीन झाले आहेत. प्रशासनाने रस्ते साफ करण्यासाठी आणि अत्यावश्यक सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. हवामानाची स्थिती पाहता, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी पर्यटक तसेच नागरिकांना उंचावरील भागात प्रवास न करण्याचा आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.