

पायलटला लँडिंग करणे शक्य नसेल तर मिस्ड अप्रोच करत असतो.
विमानतळावर लँडिंग करत असताना चार्टर्ड विमान कोसळलं.
घटनेच्या वेळी बारामतीमध्ये दृश्यमानता ३ किलोमीटर होती.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं.विमानतळावर लँडिंग करत असताना चार्टर्ड विमान कोसळलं. दृश्यमानता कमी असल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या अपघाताप्रकरणी लिअरजेट विमानाचे मालक व्हीके सिंग यांनी धक्कादायक माहिती दिलीय.
लँडिंग करताना पायलटने कदाचित धावपट्टीकडे दुर्लक्ष करत मिस्ड अप्रोच केलं असावं. मिस्ड अप्रोच म्हणजे पायलट विमान उतरवू शकला नाही आणि विमान परत वर नेले. पण प्रश्न असा आहे की घटनेच्या वेळी बारामतीमध्ये दृश्यमानता ३ किलोमीटर होती.
लँडिंग करताना पायलटला कदाचित धावपट्टी दिसली नसेल आणि त्याने मिस्ड अप्रोच केलं असावं, अशी माहिती अपघातग्रस्त विमानाच्या मालक व्ही.के. सिंग यांनी आपल्या निवेदनात दिलीय. सुरुवातीला असेच दिसते की पायलटला धावपट्टी दिसली नसेल. त्यामुळे त्याने मिस्ड अप्रोच केला असेल. जेव्हा पायलटला लँडिंग करणे शक्य नसेल तर मिस्ड अप्रोच करत असतो. 'मिस अॅप्रोच' ही एक मानक प्रक्रिया आहे जी वैमानिक करतात जेव्हा इन्स्ट्रुमेंट अॅप्रोच दरम्यान सुरक्षितपणे लँडिंग पूर्ण करता येत नाही, ज्याला अनेकदा गो-अराउंड देखील म्हणतात.
विमान वाहतूक क्षेत्रात मिस्ड अप्रोच ही एक मानक प्रक्रिया आहे, हे पायलट तोपर्यंत करतो जोपर्यंत इंस्ट्रूमेंट अप्रोच पूर्ण करू शकत नाही आणि सुरक्षितपणे उतरू शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर जेव्हा लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी होतो किंवा असुरक्षित असल्याचं दिसतं तेव्हा पायलट मार्ग सोडून देतो आणि विमान परत वरती नेत असतो.
ही प्रक्रिया International Civil Aviation Organization आणि Federal Aviation Administration सारख्या या प्रक्रिया एजन्सींद्वारे निश्चित केल्या जातात. प्रत्येक इन्स्ट्रुमेंट अॅप्रोच चार्टवर वेगळ्या विभागात लिहिली जाते. मिस्ड अप्रोच म्हणजे "लँडिंग होत नसल्यास पायलट विमान सुरक्षितपणे परत वरती नेत असतो.
दृश्यमानता आणि खराब असल्यास त्यावेळी हे टेक्निक जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडते. एव्हिएशन डिक्शनरीमध्ये, गो-अराउंड ही एक सुरक्षितता प्रक्रिया देखील आहे, ज्यामध्ये पायलट लँडिंगचा प्रयत्न रद्द करतो आणि ताबडतोब विमान परत वर घेतो. ही एक नियमित पण महत्त्वाची युक्ती आहे, जी पायलट स्वतः सुरू करू शकतो किंवा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) च्या निर्देशानुसार करू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.