ड्रीम11चा मोठा निर्णय! लोकसभेत ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर होताच ‘पे टू प्ले’ ऑप्शन रद्द; वापरकर्त्यांना पैसे...|VIDEO

Dream11 Pay To Play Cancelled: लोकसभेत मंजूर झालेल्या ऑनलाइन गेमिंग विधेयकानंतर ड्रीम11 अॅपने मोठा निर्णय घेतला आहे. पे टू प्ले ऑप्शन रद्द करण्यात आला असून कंपनीने सर्व वापरकर्त्यांना आपले पैसे काढून घेण्याचे आवाहन केले आहे.

लोकसभेत गुरुवारी ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकात ऑनलाईन गेमिंगसंदर्भात महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. दरम्यान हे विधेयक लोकसभेत मंजूर होताच ड्रीम-11 अॅपने मोठा निर्णय घेतला आहे. या अॅपच्या मूळ कंपनीने या अॅपमधील सर्व पैसे काढून घ्या असे आवाहन या कंपनीने केले आहे. त्यामुळे आता ड्रीम 11 अॅपच्या माध्यमातून पैसे लावणाऱ्यांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार पे टू प्ले हा ऑप्शन रद्द केला आहे. तसेच हे अॅप वापरणाऱ्या सर्वांनीच आपापले पैसे काढून घ्यावेत, असे आवाहनही कंपनीने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com