Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: केंद्र सरकारकडून महिन्याला मिळणार ३००० रुपये; कोणती योजना? कोण घेऊ शकतं लाभ? जाणून घ्या

PM Shramyogi Mandhan Yojana: केंद्र सरकारने नागरिकांसाठी आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम श्रमयोगी मानधन योजना.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना महिला, लहान मुले, शेतकरी,मजूरांसाठी आहे. केंद्र सरकारची अशीच एक योजना म्हणजे पीएम श्रमयोगी मानधन योजना. पीएम श्रमयोगी मानधन योजनेत मजुरांना आर्थिक मदत मिळते. असंगठित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळत नाही. त्याचसोबत त्यांना भविष्यातदेखील पेन्शन मिळत नाही. त्यामुळेच असंगठित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

असंगठित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दर महिन्याला निश्चित पेन्शन दिली जाते. त्यामुळे मजुरांचे भविष्य आर्थकदृष्ट्या सुरक्षित होणार आहे. (Government Scheme)

भारत सरकारच्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत असंगठित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दर महिन्याला ३ हजार रुपयांची पेन्शन दिली जाते. या योजनेदेखील मजुरांना दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा करायची आहे. तसेच सरकारकडूनदेखील तेवढेच पैसे दिले जातात.

या योजनेत जर मजुर २०० रुपये जमा करत असतील तर सरकारकडूनदेखील २०० रुपयांचे योगदान दिले जाते. या योजनेत १८ ते ४० वयोगटातील मजुरांना लाभ मिळणार आहे. या योजनेत कमीत कमी २० वर्ष तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहे. ६० वर्षानंतर तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जाणार आहेत. (PM Shramyogi Mandhan Yojana)

पीएम श्रमयोगी मानधन योजनेत अर्ज करण्यासाठी नागरिकांना जवळच्या कॉमन सर्विस सेंटरवर जावे लागणार आहे. तिथे तुम्हाला मजुरांचे आधार कार्ड, बँक डिटेल्स ही माहिती देऊन स्वतः ला रजिस्टर करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल.यानंतर तुमच्या खात्यातून दर महिन्याला पैसे कापले जातील. हे पैसे तुम्हाला वयाच्या ६० वर्षानंतर मिळणार आहे. (PM Shramyogi Mandhan Yojana Benefits)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe case : बिल अदा करण्यासाठी २ लाखाची मागणी; बीडीओसह ५ जणांवर गुन्हा दाखल

Sameer Bhujbal : छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची वेगळी चूल; महायुतीच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार

Amit Shaha News : शहांच्या राज्यातील भाजप नेत्यांना सक्त सूचना | Video

Ear Piercing: लहानपणी मुलांचे कान का टोचतात?

Maharashtra News Live Updates: अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; घड्याळ चिन्ह वापरता येणार

SCROLL FOR NEXT