PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पती-पत्नी दोघांनाही पीएम किसानचे ₹२००० मिळतात का? वाचा नियम काय सांगतो

PM Kisan Yojana 22nd Installment: पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. दरम्यान, पती-पत्नी दोघांनाही योजनेचा लाभ मिळतो का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पती-पत्नी दोघांनाही मिळणार लाभ?

काय आहे नियम?

पीएम किसान योजनेच्या २२ व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. पीएम किसानचे आतापर्यंत २१ हप्ते जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर हा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होऊ शकतात. दरम्यान आता पती पत्नी दोघांनाही योजनेचा लाभ घेता येतो का असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. याबाबतचे नियम जाणून घ्या.

पीएम किसान योजनेत एकाच कुटुंबातील एक व्यक्ती लाभ घेऊ शकतात. पती आणि पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. जमीन ज्या व्यक्तीच्या नावावर आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळतो. त्यामुळे जर एका कुटुंबातील दोघांनी अर्ज केले असतील तर त्यापैकी एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार आहे.

नियम काय?

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे जमीन २ हेक्टरपर्यंत असावी. त्याचसोबत शेतीयोग्य जमीन असेल तर योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांनाच दोन हजार रुपये मिळणार आहेत.

सरकारने दिलेल्या माहितीनुसाप, अपात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. जे शेतकरी निकषांमध्ये बसत नाही त्यांना २००० रुपये मिळणार नाहीत. याचसोबत हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे. ई केवायसी न केल्यास पैसे मिळणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT