PM Awas Yojana: घरकूल लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी, सौर संच बसवायला मिळणार 'CSR' फंड; बँकेतूनही घेता येणार कर्ज, वाचा

PM Awas Yojana Get 2.10 Lakh Fund: पीएम आवास योजनेत नागरिकांना स्वतः चे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत आता घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठीही अनुदान दिले जाणार आहे.
PM Awas Yojana
PM Awas YojanaSaam Tv
Published On
Summary

पीएम आवास योजनेत मिळणार २.१० लाख रुपये

सोलर पॅनल बसवण्यासाठी मिळणार अनुदान

लाभार्थ्यांना होणार फायदा

केंद्र सरकारने नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत गरीब कुटुंबातील नागरिकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. आता या योजनेबाबत अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. आता योजनेतील लाभार्थ्यांचे घरकुल बांधल्यानंतर सौरसंच म्हणजेच सोलर पॅनल बसवण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

PM Awas Yojana
EPFO Update: 'या' पीएफ खातेधारकांना e-KYC महत्वाची, अन्यथा हक्काचे पैसे बुडतील

सीएसआर फंड आणि शासनाच्या नवीन उपक्रमातून नागरिकांना ही मदत केली जाणार आहे, याबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाने आदेश काढला आहे. यानुसार, जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कार्यवाही करावी लागणार आहे.

घराचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याला विद्युत जोडणी केल्याची खात्री अधिकाऱ्यांनी करायची आहे. यानंतर पीएम सुर्यघर या पोर्टलवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करायची असेल.महावितरणामार्फत पडताळणी करुन यासाठी मंजुरी मिळणार आहे.

लाभार्थ्यांना सुरुवातीला सोलर पॅनल बसवण्यासाठी स्वतः चे पैसे गुंतवावे लागणार आहे. लाभार्थ्यांकडे पैसे नसल्यास महावितरणाचा पुरवठादार अनुदान येईपर्यंत पैसे गुंतवण्यासाठी तयार आहे की नाही हे लक्षात घ्यायचे असेल. जर असेल नसेल तर कर्ज घेता येईल. यानंतर सोलर पॅनल बसवल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.

PM Awas Yojana
NPS Scheme: ५० हजारांची पेन्शन अन् ४ कोटी एकाचवेळी; NPS योजनेतील गुंतवणूक करेल मालामाल; कॅल्क्युलेशन वाचा

लाभार्थ्यांना मिळणार २.१० लाख (PM Awas Yojana Get 2.10 Lakh Fund)

पीएम आवास योजनेतून १ लाख २० हजार रुपये घर बांधकामासाठी मिळतात. याचसोबत मनरेगातून २८ हजार ८० रुपये मिळतात. स्वच्छ भारत मिशनमधून शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये मिळतात. आता नवीन निर्णयानुसार ५० हजार रुपये राज्य सरकारकडून मिळतात. त्यातील ३५ हजार रुपये बांधकामासाठी तर १५ हजार रुपये सौलर पॅनेल बसवल्यावर मिळणार आहेत. एकूण २.१० लाखांचे अनुदान मिळणार आहे.

PM Awas Yojana
Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळवा ₹८२०००; कॅल्क्युलेशन वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com