

प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीफचे खाते असते. ज्यामध्ये दरमहा एक ठराविक रक्कम साठवली जाते. ही रक्कम तुम्ही हवी तेव्हा काढू शकता. याचे काही विशिष्ठ नियम सुद्धा आहेत. यामध्ये तुमचं खातं सक्रीय असणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला ekyc करावी लागते. जर तुम्ही ही प्रोसेस फॉलो केली नाही तर तुम्हाला तुमची रक्कम मिळत नाही. शिवाय वर्षानुवर्षे तुमची रक्कम यामध्ये अडकून राहते.
नुकताच कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनाने काही महत्वाचे बदल आणि सुचना दिल्या आहेत. त्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा निधी वर्षानुवर्षे अडकून पडला आहे. त्यांचा निधी वसूल केला जाणार आहे. असं रोजगार मंत्री मनसुख मांडविया म्हणाल्या आहेत. पुढे आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
ज्या कर्मचाऱ्यांचे PF खाते बऱ्याच वर्षांपासून निष्क्रिय (इन-ऑपरेटिव्ह) आहे. अशांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांचा निधी अडकलेला असतो. अशा कर्मचाऱ्यांसाठी KYC व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. त्यासाठी एक विशेष डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच करण्यात येईल. त्याने अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या PF खात्यांची ओळख करून पडताळणी केली जाईल आणि त्यांची थकलेली रक्कम सुरक्षितपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल.
पण या खात्यांचे KYC झालेले नसेल तर खातेधारकाला त्याची रक्कम गमवावी लागू शकते. त्यामुळे EPF खाताधारकांनी तातडीने आपलं KYC अपडेट करणं गरजेचं आहे, असा इशाराही रोजगार मंत्रींनी दिला आहे.
एक महत्वाची बाब म्हणजे, जर एखादा भारतीय कर्मचारी परदेशात काम करून पुन्हा भारतात परतला, तर त्या देशात जमा झालेला PF निधी वाया जाणार नाही. भारतात परतल्यानंतरही तो कर्मचारी आपल्या परदेशातील PFचा लाभ घेऊ शकणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.