

Whatsapp हे बऱ्याच चांगल्या कामांसाठी फायदेशीर आहे. हे बिझनेसपासून तुमच्या पर्सनल गोष्टींपर्यंत तुम्हाला हवं तसं वापरता येतं. त्यातच मेटा AI मुळे आता गुगलवर सर्च होणाऱ्या गोष्टी किंवा हवी असलेली माहिती तुम्हाला यावर मिळवता येणार आहे. याचसोबत Whatsappने त्यांच्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. पुढील लेखात तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Whatsapp युजर्सना आता त्याचे Whatsapp स्टेटस एडीट करता येणार आहेत. यासाठी मेटा AI चा वापर करावा लागणार आहे. पुर्वी स्टेटस टाकताना फोटोमध्ये काहीच बदल करता येत नव्हते. मात्र आता युजर्सना मेटा AI चा वापर करून त्यात बदल करता येणार आहे. यासाठी काय स्टेप्स फॉलो कराव्या लागतील हे पुढील लेखात जाणून घेऊयात.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp नव्या फीचरची चाचणी करतंय. त्यामध्ये Meta AI च्या मदतीने चालणारे एडीटींगचे टुल्स तुमच्या स्टेटसमध्ये बदल करू शकणार आहे. या फीचरचा मुख्य उद्देश म्हणजे युजर्सना अॅप सोडण्याची गरज पडू नये आणि ते जास्त वेळ WhatsApp वर सक्रिय राहावेत, असा आहे.
Meta AI च्या मदतीने तुमच्या स्टेटसच्या फोटोला पूर्णपणे वेगळा लूक मिळेल. यामध्ये 3D, कॉमिक बुक, अॅनिमे, पेंटिंग, क्ले, कवाई, क्लासिकल आणि व्हिडिओ गेमसारख्या थीम्स असतील. यातली खास बाब म्हणजे AI फोटो फक्त वरून फिल्टर लावत नाही, तर निवडलेल्या स्टाइलनुसार संपूर्ण इमेज पुन्हा तयार करतो. यामुळे स्टेटस जास्त आकर्षक आणि युनिक दिसेल.
जर पहिल्यांदा तयार झालेला लूक आवडला नाही, तर 'रीडू' ऑप्शनच्या मदतीने त्याच स्टाइलमध्ये फोटो पुन्हा जनरेट करू शकता. हे फीचर सध्या काही निवडक बीटा टेस्टर्ससाठीच उपलब्ध आहे. काही मोजक्या युजर्सना स्टेबल व्हर्जनमध्येही याची झलक दिसू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.