Sakshi Sunil Jadhav
बऱ्याच घरांमध्ये शेंगदाण्याचं कूट प्रत्येक भाजीत वापरला जातो. पण काही भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरल्यामुळे अॅसिडिटी, गॅस, पोटफुगी आणि जडपणा जाणवू शकतो.
वांगी पचायला जड असतात. त्यात शेंगदाण्याचं कूट घातल्याने अॅसिडिटी आणि पोटात जळजळ होण्याची शक्यता वाढते.
भेंडी चिकट असते. त्यामुळे काही लोकांचा गॅसचा त्रास वाढतो. त्यात शेंगदाण्याचं कूट घातल्याने पचायला कठीण जातं.
कोबी आणि फ्लॉवर या भाज्यांनी पोटात गॅस होते. त्यांच्यासोबत शेंगदाण्याचं कूट घेतल्याने पोटफुगी आणि अपचन होतं.
बटाटा कार्बोहायड्रेट्सने भरलेला असतो. त्यामुळे तो पचायला वेळ घेतो. शेंगदाण्याचं कूट घातल्यावर अॅसिडिटी वाढू शकते.
आंबट चव आणि शेंगदाण्याचं कूट एकत्र आल्यास पोटात आम्ल वाढतं. विशेषतः अॅसिडिटीचा त्रास असलेल्यांनी टाळावं.
जास्त तिखट मसाले आणि शेंगदाण्याचं कूट एकत्र खाऊ नका. त्याने छातीत जळजळ आणि गॅसचा त्रास वाढतो.
रात्री पचनक्रिया मंद असते. अशा वेळी शेंगदाण्याचं कूट असलेल्या जड भाज्या खाल्ल्यास गॅस वाढतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.