Sakshi Sunil Jadhav
नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात करायचं असेल, तर महाराष्ट्रात अनेक अशी ठिकाणं आहेत, जिथे निसर्ग, पार्टी, शांतता आणि अॅडव्हेंचरा अनुभव घेता येईल.
न्यू इयर म्हटलं की मुंबईत मरीन ड्राइव्ह, जुहू बीच, बांद्रा, क्लब्स आणि रूफटॉप पार्ट्यांमुळे हे परफेक्ट ठिकाण ठरेल.
पुण्यातल्या एफसी रोड, बाणेर-बालेवाडी, हिंजवडी परिसरातील पब्स आणि रिसॉर्ट्समध्ये तुम्ही खूप धमाल करू शकता.
सगळ्यात सुंदर ठिकाण म्हणजे थंडी, धुकं आणि सह्याद्रीच्या कुशीत लोणावळा न्यू इयरसाठी लोकप्रिय आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत शांत सेलिब्रेशन करणार असाल तर हे ठिकाण बेस्ट आहे.
महाबळेश्वरमधले निसर्गरम्य वातावरण, व्ह्यू पॉइंट्स आणि लक्झरी हॉटेल्स न्यू इयर सेलिब्रेशनला खास बनवतात.
मुंबईजवळचा अलिबाग बीच, रेसॉर्ट्स आणि खास न्यू इयर पार्टीमुळे हे सगळ्या तरुणांचा फेमस ठिकाण ठरले आहे.
गर्दीपासून लांब राहून न्यू इयर साजरा करायचा असेल, तर गणपतीपुळे हा उत्तम पर्याय आहे.
अॅडव्हेंचर लव्हर्ससाठी रिव्हर राफ्टिंग, कॅम्पिंग आणि बोनफायर्सची मजा घेण्यासाठी कोलाडमध्ये न्यू इयर सेलिब्रेशन करता येतं.