Virar Crime : सोसायटीतील सोलर पॅनल बसविण्यावरून वाद; रेल्वे कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल

Virar News : विरार पश्चिम परिसरातील ग्लोबल सिटी या सोसायटीमध्ये रहिवासी आहेत. दरम्यान त्यांच्या सोसायटीमध्ये सोलर पॅनल लावण्याचे काम सुरु आहे. यातून वाद निर्माण झाला. या वादातूनच हल्ला करण्यात आला
Virar Crime
Virar CrimeSaam tv
Published On

मनोज तांबे 
विरार
: विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी सोसायटीत राहणाऱ्या भारतीय रेल्वे कर्मचाऱ्याला सोसायटीच्या सोलर पॅनल बसविण्याच्या वादातून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यात लाठी, काठीने सोसायटीच्या आवारातच दोन जणांनी बेदम मारहाण केली आहे. सदरची घटना सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

भारतीय रेल्वेमध्ये एक प्रतिष्ठित अधिकारी पदावर कार्यरत असलेले हितेश कपिलदेव प्रसाद कुमार असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते विरार पश्चिम परिसरातील ग्लोबल सिटी या सोसायटीमध्ये रहिवासी आहेत. दरम्यान त्यांच्या सोसायटीमध्ये सोलर पॅनल लावण्याचे काम सुरु आहे. यातून वाद निर्माण झाला होता. या वादातूनच हल्ला करण्यात आला आहे. 

Virar Crime
Nashik : करन्सी नोट प्रेस भरती परीक्षेसाठी डमी परीक्षार्थीं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार, ७ जणांवर गुन्हा दाखल

दोघांविरोधात गुन्हा दाखल 
२३ जून २०२५ रोजी हा हल्ला झाला असून हा पूर्वनियोजित असल्याचा आरोप हितेश यांचा आहे. याबाबत बोळिंज पोलीस ठाण्यात मारहाण करणारे सोमनाथ मधु गराई व समीर मधु गराई यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. 

Virar Crime
Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक; परभणीत मोजणी रोखली, ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन

अवैध कत्तलखान्यावर छापा

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरातील जमजम कॉलनी येथे छापा टाकून २७०० किलो गोमांससह ३४ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सतत कारवाया करुनही येथील अवैध कत्तलखाने सुरूच असल्याचे या कारवाईमुळे पुन्हा एकदा अअधोरेखीत झाले असून स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com