

पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे अनिवार्य
फार्मर आयडी नसल्यास मिळणार नाही लाभ
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातलील एक योजना म्हणजे पीएम किसान योजना. पीएम किसान योजनेत वर्षाला ६००० रुपये दिले जातात. दरम्यान, आतापर्यंत एकूण २१ हप्ते देण्यात आले आहे. शेतकरी आता पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, पुढचा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना हे काम करावे लागणार आहे.
फार्मर आयडी अनिवार्य
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. जर फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. दरम्यान, केंद्र सरकार अॅग्री स्टॅक प्रोजेक्टअंतर्गत शेतकऱ्यांची डिजिटल ओळख तयार करत आहे. फार्मर आयडी ही एक डिजिटल ओळख आहे. त्यामुळेच अनेक राज्यांमध्ये आता फार्मर आयडी अनिवार्य केले आहे. येत्या काळात सर्व राज्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनिवार्य केले जाऊ शकते.
जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळणार नाही. याचसोबत इतर पीकविमा अशा योजनांचाही लाभ घेता येणार नाही.
फार्मर आयडी बनवण्याची प्रोसेस (Farmer ID Registration Process)
फार्मर आयडी बनवण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, जमिनीचे कागदपत्र, पासपोर्ट साइज फोटो, बँक पासबुक, मोबाईल नंब गरजेचा आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
सर्वात आधी तुम्हाला Agri Stack Portal वर जायचे आहे.
यानंकर क्रिएट न्यू युजरवर क्लिक करा. यानंतर आधार नंबर टाकायचे आहे. यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
यानंतर तुम्हाला अटी वाचून फॉर्म भरावा लागेल. यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल. त्याचे व्हेरिफेकेशन करा.
यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड टाकायचा आहे. त्यावर यूजर आयडी तयार होईल. यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे.
यानंतर तुम्हाला तुमचा फार्मर आयडी मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.