PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा हप्ता शनिवारी येणार, त्याआधी हे काम करा अन्यथा मिळणार नाही २००० रुपये

PM Kisan Yojana Installment Update: पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता येण्याआधी तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे.

Siddhi Hande

  • पीएम किसान योजनेचा हप्ता उद्या येणार

  • शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य

  • या शेतकऱ्यांना मिळणार नाही पैसे

पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जाणार आहे. दरम्यान,पीएम किसान योजनेचा हप्ता येण्याआधी तुम्हाला एक काम करायचे आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.

केवायसी अनिवार्य (PM Kisan Yojana KYC Mandatory)

पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे. तुम्ही जर केवायसी केले नाही तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. दरवेळी पीएम किसान योजनेचा हप्ता येण्याआधी तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात.

केवायसी करण्याची ऑनलाइन पद्धत (PM Kisan Yojana KYC Online Process)

पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ वेबसाइटवर जावे.

यानंतर फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा.

यानंतर केवायसी ऑप्शनवर क्लिक करा.

तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.

यानंतर तुमच्या फोनवर जो ओटीपी येईल तो भरा आणि केवायसी पूर्ण करा.

पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार?

पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता उद्या म्हणजेच २ ऑगस्ट रोजी येणार आहे. शेतकऱ्यांना उद्या पैसे मिळणार आहे.

पीएम किसान योजनेचा हा कितवा हप्ता आहे?

पीएम किसान योजनेत आतापर्यंत १९ हप्ते देण्यात आले आहे. आता २०वा हप्ता उद्या देण्यात येणार आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता?

पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Tenancy Agreements : भाडेकराराची नोंदणी ऑनलाइनच, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT