
केंद्राने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगी गोष्टी खरेदी करण्यासाठी ही मदत केली जाते. या योजनेत वर्षाला ६००० रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी हे पैसे जमा केला जातात. या योजनेत आता या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दिले जाणार आहेत.
पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार?
मिडिया रिपोर्टनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता २० जून रोजी येऊ शकतो.याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हे काम करायचे आहे अन्यथा तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
पैसे येण्यासाठी केवायसी गरजेचे (PM Kisan Yojana KYC)
पीएम किसान योजनेचा हप्ता येण्यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे. केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने याचसोबत ऑफलाइन पद्धतीनेही योजनेसाठी केवायसी करु शकतात.
ऑनलाइन पद्धतीने केवायसी कसे करायचे? (PM Kisan Yojana KYC Online Process)
सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर Farmers Corner या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर e-KYC वर क्लिक करा.
यानंतर आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. त्यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.
तुम्ही ऑफलाइन पद्धतीने जवळच्या CSR सेंटरमध्ये जाऊनदेखील केवायसी करु शकतात. यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि मोबाईल नंबर गरजेचा आहे. एकदा केवायसी पूर्ण झाले की पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात जमा होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तुमच्या खात्यात २००० रुपये जमा होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.