PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं नाही, तर बंद होणार पीएम किसानचे ₹६०००?वाचा नियम काय सांगतो

PM Kisan Yojana These Farmers Will Not Get Installment: पीएम किसान योजनेत जर एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर लोन असेल आणि त्याने ते कर्ज फेडलं नाही तर त्याचा लाभ बंद होतो असं बोललं जात आहे. दरम्यान, याबाबतचे नियम काय आहेत? वाचा सविस्तर

Siddhi Hande

पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडे

लोन न फेडल्यावर बंद होणार पैसे?

जाणून घ्या काय आहेत नियम

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेत २१ वा हप्ता देण्यात आला आहे. दरम्यान, आता शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डमध्ये लोनदेखील मिळते.दरम्यान, पीएम किसान योजनेत जर तुम्ही लोन भरले नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही, असं सांगण्यात येत आहे

मध्यंतरी तमिळनाडूतील नीलगिरी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये बँकेने पीएम किसान योजनेचे पैसे थांबवले होते. शेतकऱ्यांनी त्याच बँकेतून कर्ज घेतले होते. परंतु वेळेवर कर्ज फेडले नव्हते. त्यामुळे बँकेने पीएफ किसान योजनेअंतर्गत पाठवलेले १६००० रुपये बंद केले होते.

निलगिरी जिल्ह्यात पीएम किसान योजनेसाठी अर्ज केला होता. याअंतर्गत त्यांच्या खात्यात १६००० रुपये जमा झाले होते. दरम्यान, बँकेचे लोनचे पैसे न भरल्याने त्यांना पैसे मिळाले नव्हते. दरम्यान, याबाबत त्यांना ग्राहक आयोगात तक्रार केली होती. यावेळी एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. शेतकऱ्याने जरी लोनचे पैसे भरले नसतील तरीही केंद्र सरकारद्वारे पाठवलेली सब्सिडी थांबवू शकत नाही. त्यामुळे हे पैसे पुन्हा शेतकऱ्याला देण्याचे आदेश दिले होते.

बँकेला द्यावे लागले पैसे

या प्रकरणात बँकेला शेतकऱ्याचे संपूर्ण पैसे द्यावे लागले. याचसोबत २००० रुपयेदेखील अतिरिक्त द्यावे लागले. कोणत्याही प्रकारचे बँक लोन न भरल्याने सरकारद्वारे दिलेले पैसे बँक रोखू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हाताने उखडला डांबरी रस्ता, ग्रामस्थांचा ठेकेदाराविरोधात संताप

SCROLL FOR NEXT