Mumbai : "मुंबईकरांचा श्वास कोंडू देणार नाही..." सरकार अ‍ॅक्शन मोडवर, MPCB अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय, वाचा...

Mumbai Air Quality Update : मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरल्याच्या पार्श्वभूमीवर MPCB अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मालाड येथील हवा गुणवत्ता मापन केंद्राची पाहणी केली. नियमभंग करणाऱ्या बांधकामांवर कारवाई सुरू असून AQI धोकादायक नाही, असे MPCB ने स्पष्ट केले.
Mumbai : "मुंबईकरांचा श्वास कोंडू देणार नाही..." सरकार अ‍ॅक्शन मोडवर, MPCB  अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय, वाचा...
Mumbai NewsSaam Tv
Published On
Summary
  • MPCB अध्यक्षांनी मुंबईतील हवा गुणवत्ता मापन स्थिती तपासण्यासाठी मालाड केंद्राची पाहणी केली

  • मुंबईतील हवा धोकादायक नाही

  • नियमभंग करणार्‍या 81 बांधकामांना नोटिसा आणि 17 स्थळांवरील कामे थांबवली

  • मोठ्या पायाभूत प्रकल्पांनाही नोटिसा देत MPCB चे प्रदूषणविरोधी धोरण कायम

संजय गडदे, मुंबई

मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मालाड येथील सतत हवा गुणवत्ता मापन केंद्राला भेट देऊन स्थितीची पाहणी केली.

या भेटीदरम्यान कदम म्हणाले, “आज अध्यक्ष म्हणून आलो आहेच, पण मुंबईकर म्हणूनही हे मॉनिटरिंग स्टेशन योग्य प्रकारे कॅलिब्रेट झाले आहे का, याची खात्री करण्यासाठी आम्ही स्वतः जमिनीवर उतरलो आहोत.” काही दिवसांत मुंबईची हवा धोकादायक पातळीवर गेल्याचे चित्र माध्यमांमधून सादर झाले असले तरी, वस्तुस्थिती तशी नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai : "मुंबईकरांचा श्वास कोंडू देणार नाही..." सरकार अ‍ॅक्शन मोडवर, MPCB  अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय, वाचा...
Sangli : सांगलीत राडा! बहिणीच्या लग्नावरून भाऊ नाराज; दोन कुटुंबामध्ये तुफान हाणामारी, ६ जण गंभीर जखमी

माध्यमांना विनंती करताना त्यांनी सांगितले, “जनतेपर्यंत पोहोचणारी माहिती पडताळूनच द्या. चिंताजनक परिस्थिती घडलेली नाही आणि घडू देणारही नाही. एमपीसीबी आणि महानगरपालिका मुंबईकरांचा श्वास कोंडू देणार नाहीत.” महानगरपालिका क्षेत्रातील बांधकामकामी कारवाईबाबत त्यांनी माहिती दिली की, या भागात 176 बांधकामे सुरू असून 81 नोटिसा देण्यात आल्या आहेत, तर 17 कामांना स्थगिती देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

Mumbai : "मुंबईकरांचा श्वास कोंडू देणार नाही..." सरकार अ‍ॅक्शन मोडवर, MPCB  अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय, वाचा...
Crime : लाथाबुक्क्यांनी मारलं, चाकूने वार केला, अहिल्यानगरमध्ये पैशांच्या वादातून तरुणाची हत्या

तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना कोणतीही सूट नसून, “एमएमआरडीए, मेट्रो किंवा बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले. कदम यांनी विश्वास व्यक्त केला की सर्वांच्या सहकार्यातून हवेची गुणवत्ता सूचकांक (AQI) मुंबईकरांना त्रास देईल अशा पातळीपर्यंत जाऊ दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com