PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: ही ६ कामे लगेच करा, अन्यथा मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ

PM Kisan Yojana 20th Installment Date: पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ही ६ कामे आवश्यक करा अन्यथा शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार नाहीत.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेत जून महिन्यात शेतकऱ्यांना २००० रुपये दिले जाणार होते. मात्र, हा हप्ता लांबणीवर गेला आहे. परंतु आता कधीही पीएम किसान योजनेच्या हप्त्याची घोषणा होऊ शकते. लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत. परंतु पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कामे करावी लागणार आहेत.

ही कामे लगेच करा अन्यथा मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ

१.e-KYC अनिवार्य (KYC)

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई केवायसी करणे अनिवार्य आहे. तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा ऑनलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात.

२. आधार आणि बँक खाते लिंक करा

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे अॅक्टिव्ह बँक अकाउंट आधार नंबरशी लिंक असणे गरजेचे आहे.

३. बँक डिटेल्सची माहिती देताना काळजी घ्या

तुम्ही बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोडची माहिती देताना दोनदा चेक करा. चुकीची माहिती दिल्यावर ट्रान्झॅक्शन फेल होऊ शकते.

४. जमीन रेकॉर्डसंबंधित समस्या

जर जमीन रेकॉर्डमध्ये कोणतेही प्रॉब्लेम असेल तर अनेक अडचणी येऊ शकतात. जर कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील तर ते लवकरात लवकर नीट करु शकतात.

५. लाभार्थी स्टेट्‍स चेक करा (How To Check Status)

तुम्ही www.pmkisan.gov.in वेबसाइटवर जाऊन तुमचा स्टेट्‍स चेक करु शकतात. यामध्ये तुम्हाला मागील हप्त्यांचीदेखील माहिती मिळते.

६. मोबाईल नंबर अपडेट करा

जर तुमचा मोबाईल नंबर जुना असेल तर तुम्हाला ओटीपीची माहिती मिळणार नाही. त्यामुळे नवीन मोबाईल नंबर अपडेट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT