WhatsApp मधूनही तुमचं बँक अकाउंट होईल खाली; चुकूनही करू नका 'या' चुका

WhatsApp Scam: जर तुम्हीही प्रसिद्ध इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप वापरत असाल तर सावधगिरी बाळगा. नाहीतर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. व्हॉट्सअॅपद्वारे तुमचे बँक खाते कसे रिकामे होऊ शकते आणि हॅकर्सपासून कसे वाचायचे ते जाणून घेऊ.
Whats App Scam
Whats appSaam Tv
Published On

जगभरात WhatsApp हे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप वापरले जाते. एकमेकांशी बोलण्यापासून ते फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी व्हॉट्स अ‍ॅपचा वापर केला जातो. दरम्यान हॅकर्स तुमचा डेटा चोरण्यासाठी अ‍ॅपचा वापर करण्याचा प्रयत्न करतात, परंतु युझर्सला यापासून वाचवण्यासाठी, प्लॅटफॉर्मवर सुरक्षा आणि गोपनीयता सारखे अपग्रेड देखील उपलब्ध आहेत. असे काही फीचर्स आहेत, ज्याद्वारे युझर्स त्यांचे चॅट सुरक्षित ठेवू शकतात. पण जर त्याकडे लक्ष दिलं नाही तर तुम्ही मोठ्या नुकसानाला बळी पडू शकतात.

तुमचे बँक खाते धोक्यात असू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कोणत्या कृती तुम्हाला हॅकर्सपासून वाचवू शकतात.

फोटो-व्हिडिओ शेअरिंगचाही धोका

हॅकर्स व्हॉट्स अ‍ॅपद्वारे लोकांच्या फोनमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ वापरत आहेत. हॅकर्स फक्त एका क्लिकवर युझर्सचा डेटा अॅक्सेस करू शकतात. व्हॉट्सअॅप सेटिंग्जमधील एक पर्याय बंद करून, तुम्ही सायबर हल्ल्यांचा धोका कमी करू शकता आणि तुमचा फोन डेटा सुरक्षित ठेवू शकता.

Whats App Scam
Aadhaar PVC Card: घरबसल्या ऑर्डर करता येईल PVC आधार कार्ड, जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया आणि शुल्क

सायबर धोक्यापासून कोणता पर्याय वाचवेल

WhatsApp अॅप उघडा.

स्क्रीनच्या वरच्या बाजूला दिसणाऱ्या तीन बिंदूंवर (⋮) क्लिक करा.

यानंतर सेटिंग्स ऑप्शन निवडा.

चॅट्स या सेक्शनवर क्लिक करा

मीडिया व्हिजेबिलिटी टॉगल पर्याय असेल, तो बंद करा.

या चुका करू नका

काही चुका करून तुमचा फोन हॅकर्सकडून हॅक होऊ शकतो. जर तुम्ही व्हॉट्स अ‍ॅपवर आलेल्या लिंक्स, फोटो इत्यादींवर क्लिक केले तर सायबर गुन्हेगार तुम्हाला त्यांचा बळी बनवू शकतात. कोणता फोटो स्कॅम चालू आहे. यातून युझर्सचे बॅक अकाउंट खाली केलं जात आहे. याशिवाय कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. बहुतेक हॅकर्स लिंक्सद्वारे फोन हॅक करण्याचा प्रयत्न करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com