Aadhaar PVC Card: घरबसल्या ऑर्डर करता येईल PVC आधार कार्ड, जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया आणि शुल्क
आजही भारतात बरेच लोक जुने आधार कार्ड वापरत आहेत. कागदाचे कार्ड असल्यामुळे ते लॅमिनेशनशिवाय वापरता येत नाही. पण तेही फाटण्याची किंवा खराब होण्याची भीती असते. कार्ड खराब झाल्यानंतर आधार कार्ड पुन्हा पुन्हा प्रिंट करावे लागू शकते. यासर्व त्रासांपासून वाचण्यासाठी, तुम्ही नवीन प्रकारचे आधार कार्ड बनवू शकता. ते फाटण्याची भीती नाही. याशिवाय ते पाण्यानेही खराब होत नाही.
आतापर्यंत कोट्यवधी आधारधारकांनी पीव्हीसी आधार कार्ड बनवले आहेत, परंतु जर तुम्ही त्या संख्येत नसाल तर तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आपण पीव्हीसी कार्ड कसं मिळवायचं याची माहिती जाणून घेऊ. तुम्हाला माहिती का? हे पीव्हीसी कार्ड घरी बसून सुद्धा मागवता येते. पीव्हीसी आधार कार्ड ऑक्टोबर २०२० मध्ये लाँन्च करण्यात आले. हे कार्ड प्लास्टिकचे बनलेले आहे. ते फाटण्याची भीती नसते. ते नवीन मतदार कार्ड किंवा पॅन कार्डसारखे दिसते.
ते कार्ड तुम्ही तुमच्या पाकिटात किंवा खिशात सहजपणे ठेवू शकता. सरकार आधार कार्ड धारकांना पीव्हीसी आधार बनवण्याची सुविधा प्रदान करते. प्लास्टिक आधार कार्डसाठी ५० रुपये शुल्क भरावे लागेल. ऑर्डर केल्यानंतर तुम्ही ते तुमच्या पत्त्यावर देखील पोहोचवू शकता. तुम्ही यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवरून पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करू शकता.
Aadhaar PVC Card ऑनलाइन कसं मागवणार
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि भाषा निवडा.
यानंतर, “My Aadhaar” विभाग निवडा.
येथे “Order Aadhaar PVC Card” हा पर्याय दिसेल, तो निवडा.
आधार कार्डचे १२ अंक प्रविष्ट करा. यात तुम्ही २८ अंकी नोंदणी आयडी देखील देऊ शकता.
कॅप्चा कोड टाकल्यानंतर, ओटीपी पडताळणी करा.
यासाठी, सेंड ओटीपीवर क्लिक करा आणि नंतर लिंक केलेल्या फोन नंबरवर ओटीपी प्राप्त होईल.
ओटीपी पडताळणीनंतर, सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
यानंतर, पीव्हीसी आधार कार्डसाठी ५० रुपये शुल्क भरा. पावती आणि सेवा विनंती क्रमांक (एसआरएन) सेव्ह करा.
सेवा विनंती क्रमांकाच्या मदतीने तुम्ही पीव्हीसी आधारची स्थिती आणि ते कधी उपलब्ध होईल हे तपासू शकाल.
प्रक्रिया केल्यानंतर ५ कामकाजाच्या दिवसांत पीव्हीसी आधार कार्ड पोस्ट ऑफिसला पाठवले जाईल. येथून पीव्हीसी आधार कार्ड तुमच्या घरी येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.