E shram Card: ई-श्रम कार्ड काढा आणि दरमहा 3000 रुपये मिळवा; जाणून घ्या पात्रता अर्ज प्रक्रिया

E shram Card: ई-श्रम कार्ड योजना भारत सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी सुरू केली असून, यामुळे त्यांना अनेक फायदे मिळतात.
E-Shram Card  Eligibility Application Process
E shram Card
Published On

देशात कोट्यवधी लोक असंघटित क्षेत्रात काम करतात. बांधकाम कामगार, घरकामगार, रिक्षाचालक, शेतमजूर किंवा लहान दुकानदार. या लोकांना कायमस्वरूपी रोजगार नसतो. तसेच त्यांना कोणत्याही संस्थेकडून पेन्शन किंवा विमा सारख्या सुविधा मिळत नाहीत. यामुळे सरकारची ई-श्रम कार्ड योजना खूप वरदान ठरते.

या योजनच्या माध्यमातून कामगार ३००० रुपयांची पेन्शन मिळू शकतात. फायदे थेट कामगारांचे जीवन बदलत आहे. ई-श्रम कार्ड म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत, पैसे कसे तपासायचे आणि पात्रता काय आहे हे आपण जाणून घेऊ .

ई-श्रम कार्ड म्हणजे काय?

ई-श्रम योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. देशभरातील असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जे कामगारांची नोंदणी केली जाते. त्यांना एक 12 अंकी UAN (Universal Account Number) दिला जातो. त्यातून कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो.

ई-श्रम कार्डचे फायदे (E Shram Card Benefits)

दरमहा ३००० हजार रुपयांची पेन्शन मिळण्याची संधी असते.

अपघाती विमा – मृत्यू झाला तर २ लाख, अपंगत्वासाठी १ लाख रुपये मिळतात.

भविष्यातील सरकारी योजनांमध्ये प्राधान्य मिळते.

रोजगार, आरोग्य, अपंगत्व, आणि कुटुंब सहाय्यासाठी लाभ मिळतो.

काय आहे पात्रता

अर्जदार भारतीय नागरिक असला पाहिजे.

वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावं.

वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा असावे.

अर्जदार असंघटित क्षेत्रात काम करणारा असावा.

कागदपत्रे काय लागतील?

आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असलेले)

बँक पासबुक

रेशन कार्ड किंवा उत्पन्न प्रमाणपत्र

निवास प्रमाणपत्र

पासपोर्ट साइज फोटोदेखील लागेल.

ई-श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढणार?

अधिकृत वेबसाइटला https://eshram.gov.in

भेट द्या

आपला मोबाईल नंबर (आधार लिंक केलेला) टाका.

OTP टाकून आपली वैयक्तिक व कामाची माहिती भरावी लागेल.

बँक तपशील आणि कागदपत्रे अपलोड करावे.

अर्ज केल्यानंतर तुम्हाला UAN नंबरसह ई-श्रम कार्ड मिळेल.

दरम्यान, हे कार्ड PDF स्वरूपात डाउनलोड करून ठेवता येतं

E-Shram Card  Eligibility Application Process
Pension Scheme: काय आहे ५५ रुपयांची पेन्शन योजना? जाणून घ्या दरमहा ३००० रुपये कोणाला आणि कसे मिळतील?

पेन्शन कशी मिळेल?

ई-श्रम कार्डधारकांना ६० वर्षे पूर्ण झाल्यावर मासिक ३००० पेन्शन मिळण्याची योजना सुरू आहे.

यासाठी कामगारांना दरमहा एक छोटी रक्कम भरावी लागते.

ही रक्कम वयानुसार ठरते.

सरकारही त्यात समान योगदान करते.

नंतर बँक खात्यात थेट ३००० पेन्शन जमा होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com