PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: खुशखबर! पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट; या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार ₹२०००

PM Kisan Yojana 21st Installment Update: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. दरम्यान, ३० नोव्हेंबरपू्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

या तारखेपर्यंत खात्यात येऊ शकतो २१वा हप्ता

पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी हे काम करा

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे कोट्यवधी लाभार्थी आहेत. पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता येण्याची शेतकरी वाट पाहत आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. दरम्यान, आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण २० हप्ते देण्यात आले आहेत. आता लवकरच २१वा हप्ता देण्यात येईल.

केंद्र सरकारने शेवटचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी जारी केला होता. त्यानंतर २१वा हप्ता ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता होती.मात्र, ऑक्टोबरमध्ये पैसे आले नाहीत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अजूनही पैसे आले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार, पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता ३० नोव्हेंबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. महिनाअखेरीस शेतकऱ्यांना खुशखबर मिळू शकते. मागच्या वर्षी ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पैसे दिले होते. दरम्यान, यावर्षी अजूनही तारीख जाहीर केलेली नाही.

या शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ (These Farmer will Get PM Kisan Installment)

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता मिळाला आहे त्यांना २१वा हप्ता मिळणार आहे. परंतु त्याआधी शेतकऱ्यांना ई केवायसी आणि व्हेरिफिकेशन पूर्ण करावे लागणार आहे. यासाठी ते अधिकृत वेबसाइटवरुन केवायसी करु शकतात किंवा ऑफलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात.

ई केवायसी कसं करायचं? (PM Kisan Yojan eKYC Process)

सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर तिथे दिलेल्या फार्मर्स कॉनरवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तिथे केवायसीच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुमचा आधार नंबर आणि लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे.

तुमच्या फोनवर एक ओटीपी येईल.

हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचं केवायसी पूर्ण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT