PM Kisan Update : पीएम किसान योजनेचे २००० रुपये खात्यात कधी जमा होणार? कोट्यवधी शेतकऱ्यांना दिवाळीत मिळाली गोड बातमी

PM Kisan Nidhi Installment: दिवाळीत पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच २१ व्या हप्त्याचे २००० रुपये जमा होणार आहेत.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On
Summary
  • पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता कधी येणार?

  • दिवाळीत कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी गोड बातमी

  • २००० रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार

पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा देशभरातील शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांसाठी काहीअंशी आधार असलेल्या या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. तीन हप्त्यांत डीबीटीद्वारे रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. एका हप्त्याची रक्कम दोन हजार रुपये असते. आता २१ व्या हप्त्याबाबत नवी अपडेट समोर आली आहे.

पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीत गोड बातमी मिळाली आहे. छठ पूजेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे २००० रुपये जमा होतील अशी अपेक्षा आहे. ही रक्कम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

दरम्यान, ६ नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यामुळं पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याचे २००० रुपये त्याच काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे बोलले जात आहे.

पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये पीएम किसान योजनेचे २००० रुपये तेथील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, अशी माहिती आहे. पुरामुळे या राज्यांमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या राज्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेच्या हप्त्याची रक्कम लवकर जमा करण्यात आली होती.

PM Kisan Yojana
Bihar : बिहारच्या राजकारणाला धक्कादायक वळण; स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या JMM ची निवडणुकीतूनच माघार

शेतकऱ्यांनी आपलं नाव कसं चेक करावं?

  • pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. Kisan Corner या सेक्शनवर क्लिक करावे.

  • आता Beneficiary List वर क्लिक करून आपलं राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावा.

  • 'रिपोर्ट प्राप्त करें'वर क्लिक करून चेक करावं

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी लगेच करा हे काम

eKYC, आधार लिंकिंग आणि बँक तपशील तपासून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. तसेच यासंदर्भातील अपडेट अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर जाऊन तपासू शकता. जर फोन नंबर लिंक असेल तर SMS Alerts द्वारे २१ व्या हप्त्यासंदर्भात अपडेट मिळवू शकता.

PM Kisan Yojana
Bihar Election : इंडिया आघाडीनं पहिला मोठा डाव टाकला! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाचे चेहरे ठरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com