PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता; कारण काय?

PM Kisan Yojana 21st Installment: पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सध्या शेतकरी विचारत आहेत. दरम्यान, आता काही शेतकऱ्यांना योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाहीये.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On
Summary

पीएम किसान योजनेबाबत अपडेट

या शेतकऱ्यांना मिळणार नाही २१वा हप्ता

शेतकऱ्यांना ₹२००० न मिळण्याची कारणे

पीएम किसान योजनेचे लाभार्थी २१व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेत पैसे कधी येणार असा प्रश्न लाभार्थी विचारत आहेत. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात लाभार्थ्यांना पैसे दिले जातील, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या योजनेत काही शेतकऱ्यांना २१वा हप्ता मिळणार नाहीये. हा हप्ता न मिळण्यामागची कापणे जाणून घ्या.

PM Kisan Yojana
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

या शेतकऱ्यांना मिळणार नाही २००० रुपये

पीएम किसान योजनेत जे शेतकरी पात्रत आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत सर्व शेतकऱ्यांना केवायसी करायची आहे. जे शेतकरी केवायसी करणार नाहीत. त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात. केवायसी केल्यानंतरच तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे.

पीएम किसानचा हप्ता कधी मिळणार? (PM Kisan Yojana Installment Date)

पीएम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिला जाईल, असं सांगितलं जात होतं. ६ नोव्हेंबर रोजी बिहारच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याआधी पैसे दिले जातील असं सांगितलं होतं. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना २००० रुपये कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या दिवशी खात्यात ₹२००० येण्याची शक्यता

पीएम किसान योजना केवायसी प्रोसेस (PM Kisan Yojana KYC Process)

सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर होमपेजवरील फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा.

यानंतर ई केवायसी या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका.

तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा. यानंतर तुमचे केवायसी पूर्ण होईल.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दिवाळीनंतर पीएम किसान योजनेचा हप्ता येणार; समोर आली अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com